शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कारभार सोसायटीचा: पार्किंगसाठी वाहन आपल्या नावेच हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:56 PM

आपले वाहन आपण कथन केल्याप्रमाणे आपल्या नावे नाही. कोणत्याही कुटुंबामधील व्यक्तीच्या नावे नाही़ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध आक्षेप घेता येणार नाहीत.

अ‍ॅड. एस. एस. देसाई

माझ्या सोयायटीमध्ये ३४ पैकी १0 सदनिका या भाड्याने दिल्या आहेत़ त्या १0 सदनिकांमधील भाडेकरू संस्थेमध्ये असलेल्या सुविधा मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यांना लावण्यात येणारे भोगवटा शुल्क हे खूपच कमी आहे. सबब ते वाढविता येईल का? - विकास गोसावी

भोगवटा शुल्क हे शासन निर्धारित दराने घ्यावे, असा नियम आहे. हे शुल्क निर्धारित दरापेक्षा जास्त आकारणे बेकायदेशीर आहे. संस्था स्तरावर हे शुल्क वाढविणे अयोग्य आहे. मुख्यत: ज्या सदनिकेमध्ये भाडेकरू आहेत, त्या सदनिकेचे मासिक बिल हे त्या सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार इतर सभासदांप्रमाणे आकारले जाते. सबब अशा वेळी संस्थेस नुकसान किंवा अडचण होण्याचे काहीच कारण नाही. भाडेकरू ज्या सदनिकेमध्ये आहे, त्या सदनिकेसाठी नियमित मासिक दरापेक्षा किमान १0 टक्के रक्कम संस्थेस कोणत्याही अतिरिक्त सुविधा न देता मिळत असते. सबब संस्था पदाधिकाऱ्यांनी याविषयी अधिक पैसे घेण्याचा विचार करणे अयोग्य आहे.

माझ्या सोसायटीमध्ये प्रत्येक सदनिकेसाठी ९ वाहनतळे उपलब्ध आहे. माझे वाहन माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या नावे नाही. माझे वाहन माझ्या मित्राच्या नावे आहे. तो माझ्या कुटुंबाचा भाग नाही. सोसायटी मला वाहनतळ देण्यास मज्जाव करत आहे. हे योग्य आहे का?- आर. सकारीयासंस्थेचा कारभार हा संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार चालतो. मंजूर उपविधीनुसार प्रत्येक सदनिकेसाठी किमान एक वाहनतळ वितरित करणे आवश्यक आहे. जेवढ्या सदनिका तेवढे वाहनतळ उपलब्ध असतील, तर आपल्या संस्थेमध्ये खरे तर चांगली स्थिती आहे. जेथे प्रत्येक सदनिकेसाठी एक वाहनतळ उपलब्ध आहे. सबब आपल्या सदनिकेसाठी एक वाहनतळ उपलब्ध आहे. आपली समस्या वाहनतळाची उपलब्धता नसून, त्यावर आपल्या वाहनतळाचा वापर संस्था करू देणार का, असा आहे. संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार संस्थेमधील वाहनतळाचा वापर हा केवळ सभासद, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा उपविधीमध्ये असलेल्या कुटुंब या व्याख्येमध्ये बसणाºया व्यक्तींसाठी उपलब्ध होते. आपले वाहन आपण कथन केल्याप्रमाणे आपल्या नावे नाही, तसेच आपल्या कोणत्याही कुटुंबामधील व्यक्तीच्या नावे नाही़ या स्थितीमध्ये संस्थेच्या पदाधिकाºयांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध कोणतेही आक्षेप घेता येणार नाहीत. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे, असे म्हणावे लागेल़

सहकारी संस्थेचा कारभार हा निवडणूक प्रक्रिया पार पाडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो, परंतु जेव्हा एखादा सभासद संस्थेच्या निर्णयाविरुद्ध दावा/तक्रार करू इच्छितो, तेव्हा अशा सभासदाने संस्थेचे पदाधिकारी यांना संस्थेसोबत पक्षकार करणे आवश्यक आहे का? यासंबंधी मार्गदर्शन व्हावे. - शंकर साळीकोणतीही संस्था महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 च्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था असते. अशा संस्थेची व्याख्या म.स.आ. १८६0 मध्ये केलेली असते. सबब त्याविषयी कोणतीही अडचण नसते. कायद्यामध्ये संस्था म्हणजे काय याविषयी विस्तृतपणे व स्पष्टपणे विवेचन करण्यात आले आहे, तसेच संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर त्याचे अधिकार इ. संबंधी माहिती आहे़ सबब केवळ संस्थेच्या नावे तक्रार करणे किंवा संस्थेचे एखाद्या सभासदाविरुद्ध किंवा कोणाच्याही विरुद्ध दावा/तक्रार करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य व योग्य आहे. आपल्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर असे आहे की, संस्थेविरुद्ध दावा करताना केवळ संस्थेविरुद्ध दावा करावा. त्याच्या सर्व किंवा काही पदाधिकारी यांना पक्षकार करण्याची कायद्यामध्ये आवश्यकता नाही. दावा करणाºया सभासदाने संस्थेची कार्यपद्धती/ठराव/घटना/कागदपत्रे यांना आव्हान देताना पदाधिकारी यांना पक्षकार करणे आवश्यक नाही. कारण संस्था ही कायद्याने निर्माण केलेला व्यक्ती असल्यामुळे अशा व्यक्ती म्हणजे कृत्रिम व्यक्ती या नेहमीच पदाधिकारी, संस्थेच्या नावाने व त्या संस्थेच्या शिक्क्यासह कामकाज करतात. पदाधिकारी यांना पक्षकार न करणे हे दावा/तक्रार अयोग्य करत नाही. सबब दावा हा केवळ संस्थेविरुद्ध करावा.

(या सदरासाठी वाचक आपले प्रश्न lokmatsociety2020@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात.)

टॅग्स :Parkingपार्किंग