विश्वासासारखी नाजूक गोष्ट दुसरी कोणती नसावी. एकदा का नात्यातील विश्वास उडाला तर नातं तुटतं. पण प्रत्येकवेळी टोकाची भूमिका घेऊन नातं तोडण्याची घाई केलीच पाहिजे असं नाहीये. तुमचं बॉंडींग कसं आहे यावर तुम्ही तुमचं डॅमेज झालेलं नातं पुन्हा दुरुस्त करता येतं. चला जाणून घेऊया यासाठीच्या काही खास टिप्स...
परिस्थिती समजून घ्या
विश्वास तुम्ही तोडला असेल किंवा तिने तोडला असेल आधी ती परिस्थिती समजून घ्या. स्वत:ला त्याच्या जागी ठेवून एकदा त्यांच्या बाजूनेही विचार करा. वेगवेगळ्या दिशेने या गोष्टीचा विचार करा. उगाच रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयावर ठाम राहू नका.
योग्य संधी शोधा
एकदा गमावलेला विश्वास असा एका रात्रीत परत मिळवता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे सहनशक्ती असायला हवी. जर तुम्हाला पुन्हा तुमटं नातं रुळावर आणायचं असेल तर योग्य संधीची वाट बघा. योग्य संधी मिळताच तुमच्या पार्टनरसोबत चर्चा करा. शांतपणे चर्चा करा आणि तुमच्या मनात काय सुरु आहे हे नीट सांगा. त्यासोबतच तुमचा पार्टनर काय बोलतो तेही नीट ऐका. संवाद केल्याशिवाय कोणताही प्रश्न सुटत नाही.
योग्य दृष्टीकोन
दोघांनीही आपल्या भावनांना धरुन जो निर्णय घेतला आहे त्यावर कायम रहायला हवं. तुम्ही जे बोलला ते तसं वागायला हवं. त्यात तफावत असेल तर नातं पुन्हा कोलमडेल. तुम्ही जर एखाद्या गोष्टीची कमिटमेंट केली असेल तर ती पाळा. पुन्हा नातं तुटण्याला संधी निर्माण करु नका.
वादळ शमण्यासाठी वेळ द्या
काही वाद झाल्यानंतर आणि रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयानंतर तुमच्या नात्याला नॉर्मल होण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला झालेलं सगळं विसरायला, त्यावर विचार करायला वेळ लागणार असतो. कारण रागात आपण काहीही बोतलो. हा काळ नात्याची परीक्षा घेणारा असतो. त्यामुळे तुमचं नातं पुन्हा फुलण्यासाठी जरा वेळ द्या.
पुन्हा तो विषय काढू नका
एकदा तुटलेलं नातं जर समजदारीने पुन्हा रुळावर आणलं गेलं असेल तर ज्या गोष्टीमुळे तुम्ही दूर गेले होता, त्या गोष्टी पुन्हा काढू नका. पुढील आयुष्याचा विचार करा. तुमचं नातं पुढच्या लेव्हला कसं नेता येईल याचा विचार करा. भूतकाळातील विषय काढून पुन्हा त्रास करुन घेऊ नका.