महिला आणि पुरूष यांच्यातील कोणत्याही नात्यात विश्वास खूप गरजेचा असतो. मग ते नातं बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्डचं असो वा पती पत्नीचं असो. महिलांच्या बाबतीत हे म्हटलं जातं की, त्या स्वभावाने लाजाळू आणि संकोची असतात. त्यामुळे त्या अनेक गोष्टी त्यांच्या पतीला किंवा बॉयफ्रेन्डला सांगत नाहीत. महिला कोणत्या गोष्टी पुरूषांना किंवा बॉयफ्रेन्डला सांगत नाहीत याचा खुलासा एका सर्व्हेतून करण्यात आला आहे.
* लग्नापूर्वीच्या प्रेम संबंधाविषयी
एखाद्या तरूणीचे लग्नापूर्वी जर प्रेम संबंध होते, तर त्या गोष्टी कोणतीही तरूणी पतीपासून लपवते. याचे कारण की, महिला ह्या त्यांच्या इमेजबद्दल खूप जागरूक असतात. त्यांची इमेज खराब व्हावी, असे त्यांना अजिबात वाटत नाही. महिला आणि तरूणी नेहमीच त्यांचे प्रेम प्रसंग लपवतात. कारण त्यांना त्यांचा सुखी संसार उध्वस्त करायचा नसतो.
* मेकअपच्या गोष्टी
महिला कधीही त्यांच्या मेकअपच्या गोष्टी बॉयफ्रेन्डला किंवा पतीला सांगत नाहीत. महिलांना हे कधीही आवडत नाही की, बॉयफ्रेन्ड किंवा पतीला त्यांच्या मेकअप सिक्रेटबद्दल माहिती पडावे.
* त्यांच्या परीवाराशी निगडीत गोष्टी
जास्तीत जास्त महिला ह्या पती किंवा बॉयफ्रेन्डसमोर तिच्या परीवाराच्या इमेजबद्दल चांगलीच जागरूक असते. परीवारातील कोणत्याही व्यक्तीबद्दल पतीला सांगताना ती खूप सावधपूर्वक सांगते. आपल्या आईबाबतीत किंवा परीवारातील ब-याच गोष्टी सांगण्यात ती जरा टाळाटाळ करते.
* मनातल्या जुन्या आठवणी
एक महिलेच्या मनात इतक्या गडद भावना असतात की, त्या सर्व भावना ती तिच्या साथीदाराला सांगू शकत नाही. सर्व्हेनुसार एक महिला तिच्या भूतकाळाबद्दल पती किंवा बॉयफ्रेन्डला सांगायला घाबरते. कारण तिला भीती असते की, आता सुखातलं नातं तुटणार तर नाही ना.
* काही खोट्या गोष्टी
नात्यामध्ये स्पेस मिळवण्यासाठी, फ्लर्टसाठी, भांडणासाठी, सेक्ससाठी, स्वत:ला बदलण्यासाठी, मौज-मस्तीसाठी अनेक खोटे बोलले जाते. जे कोणतीही महिला आपल्या साथीदाराला सांगत नाही.