(Image Credit: www.rd.com)
खरंतर प्रेमाची व्याख्या अजून कुणी करु शकलं नाहीये. प्रेमाकडे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने पाहिलं आहे. खरं प्रेम काय असतं हेही सांगण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट असते. सगळ्यांनाच खरं प्रेम मिळतं असं नाही. काहींना केवळ टाईमपास करायचा असतो तर काहींना केवळ फिजिकल रिलेशन ठेवायचं असतं. जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात तेव्हा ते दोघेही वेगळ्याच विश्वात असतात. त्यांच्यात कितीही भांडणे झाली तरी ते सोबत राहतात. खासकरुन मुली जेव्हा आपल्या पार्टनरवर खरं प्रेम करतात तेव्हा ते कसं ओळखायचं याचे काही संकेत खालीलप्रमाणे सांगता येतील.
1) ती तुमच्या सूख-दुखात साथ देते
ती तुमच्यासोबत सतत असते. जेव्हा तुम्हाला नोकरीवरून काढलं जातं, जेव्हा तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे नसतात, तेव्हाही ती तुमच्यासोबत असते. कितीही वाईट परिस्थितीमध्ये ती तुम्हाला सोडून जात नाही. तुम्ही तिच्यासोबत हवं ते शेअर करु शकता आणि त्यावरुन तुम्हाला जजही केलं जात नाही. तुमच्या खडानखडा गोष्टी तिला माहीत असतात तरीही ती तुमच्यावर प्रेम करत असते.
2) तुम्ही भरकटले असताना योग्य मार्ग दाखवते
जेव्हा तुमचं घरातील कुणाशी भांडण झालं असेल किंवा एखाद्या मित्राशी भांडण झालं असेल तेव्हा ती तुमचं सगळं ऐकून घेते. त्यासोबतच ती तुम्हाला तुमच्याही चुका लक्षात आणून देते. ती तुमची मैत्रीण आणि मार्गदर्शक असते. हे तुम्हालाही माहीत असतं की, तुम्ही सल्ला घेण्यासाठी तिच्यावर अबलंबून असता.
3) ती भांडते पण कधी सोडून जात नाही
तुम्ही कधीही भांडण न करणारं कपल पाहिलं का? भांडण, वाद हे तर कोणत्याही नात्याचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा महिला पार्टनरच्या पूर्णपणे प्रेमात असते तेव्हा भांडत असली तरी हे नातं संपवण्याचं शस्त्र म्हणून कधीही भांडणाचा वापर करत नाही. काही गोष्टी, काही अडचणी दूर करण्यासाठीच हे भांडण असतं.
4) तुम्ही जसे असाल तसे स्वीकारते, बदलायला सांगत नाही
दोन व्यक्ती एकसारख्या असूच शकत नाही. हे त्यांचं वेगळेपण असतं. जी महिला तुमच्या प्रेम करते ती तुम्हाला तुम्ही आहात तसे स्वीकारते. कारण प्रेमात असलेली व्यक्ती कधीही कोणत्याही गोष्टीची तुलना करत बसत नाहीत. ती तुमच्या प्रेमात असते तुमच्या कमी-जास्त असण्याच्या नाही. ती कधीही तुम्हाला बदलण्याचाही प्रयत्न करीत नाही.
5) ती सदैव तुमच्यासाठी हजर असते
तुम्हाला जेव्हाही काही बोलायचं असतं, काही सांगायचं असतं तेव्हा हजर असते. ती कामात असेल तर ती किमान तुम्हाला नंतर बोलू असेही सांगते. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तिची प्रायोरिटी असता.
6) भविष्याबाबत तुमच्याशी बोलते
जेव्हा एखादी मुलगी आपल्या पार्टनरच्या प्रेमात असते तेव्हा ती केवळ वर्तमानाचा नाहीतर भविष्याचाही विचार करते. भविष्याबाबत वेळोवेळी पार्टनरशी चर्चा करते.
7) कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमचं मत जाणून घेते
जी महिला आपल्या पार्टनरवर खरं प्रेम करते ती कधीही पार्टनरला न सांगता कोणताही निर्णय घेत नाही. ती कोणताही महत्वाचा, आयुष्यातील मोठा निर्णय घेताना पार्टनरचं मत जाणून घेते. ती सगळ्या गोष्टी आपल्या पार्टनरसोबत शेअर करते.