Relationship : बदलत्या लाइफस्टाइलसोबत मुलींमध्येही अनेक बदल बघायला मिळत आहेत. अनेक शोधांमधून असेही समोर आले आहे की, मुलं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींकडे आकर्षित होतात. याच कारणामुळे अशा कपल्सची संख्या वाढत आहे, ज्यात मुलीचं वय जास्त असतं आणि मुलाचं कमी. पण कोणत्या कारणांमुळे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींकडे मुलं आकर्षित होतात हे जाणून घेऊया....
1) शोऑफ कमी असतो
२४ ते २५ वयापर्यंत मुलींमध्ये दिखावा करण्याचं प्रमाण अधिक असतं असं निरीक्षण आहे. पण या वयापुढे गेल्यावर त्यांच्यात या गोष्टी कमी होतात. साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांची हीच अदा कमी वयाच्या मुलांना अधिक भावते.
2) जबाबदारी वाढते
वाढत्या वयाससोबत जबाबदारी येणे सामान्य बाब आहे. प्रत्येकजण मानसिक रुपाने जबाबदार होत असतो. आणि प्रत्येक मुलाला एक जबाबदार मुलगी आपल्या आयुष्यात असावी असं वाटत असतं. जेणेकरुन ती त्याला आणि त्याच्या आयुष्यातील गोष्टी सांभाळू शकेल. वयाने जास्त मुलींकडे आकर्षण वाढण्याचं हेही एक महत्वाचं कारण मानलं जातं.
3) बाचाबाची कमी होते
वाढत्या वयासोबत मुलींमध्ये परिपक्वता येते. तशाही मुली मुलांपेक्षा लवकर समजदार होता आणि आयुष्यातील उतार-चढाव लवकर समजतात. त्यामुळे विनाकारणच्या गोष्टींवर भांडत बसण्यात त्यांना रस नसतो. वयाने मोठ्या मुलींही ही गोष्ट मुलांना फार आवडते.
4) आत्मनिर्भर असतात
वयाच्या एका टप्प्यानंतर मुलींना आपल्या खर्चांसाठी मुलांची गरज नसते. मुलीही आता मुलांच्या बरोबरीत नोकरी करुन कमाई करत आहेत. आपल्या मोबाइल बीलपासून ते शॉपिंगचा खर्च त्या स्वत: करत आहेत. इतकेच काय तर त्या त्यांच्या बॉयफ्रेन्डचा खर्चही उचलू शकतात. अशा आत्मनिर्भर मुलींवर मुलं का फिदा होणार नाहीत?
5) स्वतंत्र्य
वयाने मोठ्या असलेल्या आत्मनिर्भर असण्यासोबतच आपले निर्णय स्वत: घेतात. छोट्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी त्यांना बॉयफ्रेन्डची गरज पडत नाही. मुलांनाही हेच हवं असतं की, आपल्या पार्टनरने तिचे प्रॉब्लेम स्वत: तिने दूर करावेत. त्यामुळेच कमी वयाचे मुलं वयाने मोठ्या मुलींना कूल मानतात.
6) अनुभव
वयाने मोठ्या असलेल्या मुलींना जीवनात अनेक अनुभव आलेले असतात. त्यामुळे काय करावं, काय करु नये हे त्यांना चांगलं माहीत असतं. त्यामुळे त्या रिलेशनमध्येही आपल्या अनुभवांचा उपयोग करुन घेतात.