शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

आपण आहात मुलांचे ‘रोल मॉडेल’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 3:26 PM

बघा, बरं जरा स्वत:ला तपासून..

ठळक मुद्देआपण जसे बोलू, जसे वागू तसाच संस्कार मुलांवर नकळतपणे होत असतो. त्यामुळे आपणच त्यांचे रोल मॉडेल असतो.मुलांना जर लहानपणापासून चांगल्या मॅनर्सची सवय लावली, तर तेही त्याचं अनुकरण करतात.वाचनसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी मुलं वाचनातून शिकतात.

- मयूर पठाडेमुलांच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी दोन गोष्टी दिसतात. एकतर त्यांचे अति लाड, अति कौतुक नाहीतर मग प्रत्येक गोष्टीत त्यांना घालून पाडून बोलायचं. तुला अक्कलच नाही, एवढीशी गोष्ट सांगितली तरी कळत नाही.. तुला किती वेळा सांगायचं?.. अशी वाक्यं पालकांच्या तोंडून कायम निघत असतात. पण अशी वाक्यं मुलांसाठी खूपच घातक असतात, हे पालकांच्या लक्षातच येत नाही. काहींना वाटतं, रागावल्याशिवाय त्यांना कळतच नाही. त्याशिवाय ते वठणीवर येतच नाहीत.. पण मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील, त्यांनी तुमचं ऐकावं, चांगल्याच गोष्टी कराव्यात, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना रागवण्यापेक्षा आणखीही काही गोष्टी आहेतच की.बघा, त्यांचा वापर करून. मुलांना चांगल्या सवयी नक्की लागतील. गेल्या भागात आपण त्याविषयी बोललो होतो, आता या आणखी काही गोष्टी.. आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठीही..मुलांना चांगल्या सवयी कशा लागतात?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं ही ‘आपली’च असतात. ती आपलंच अनुकरण करीत असतात. आपण जसे बोलू, जसे वागू तसाच संस्कार त्यांच्यावर नकळतपणे होत असतो. त्यामुळे आपणच त्यांचे रोल मॉडेल असतो. हे रोल मॉडेल चांगलंच असलं पाहिजे याची काळजी आपण घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण घरात जसे वागतो, त्याचंच अनुकरण मूल करीत असतं. त्यासाठी अगोदर आपली वागणूक आदर्श अशीच असली पाहिजे.२- मुलांना जर लहानपणापासून चांगल्या मॅनर्सची सवय लावली, तर तेही त्याचं अनुकरण करतात. साध्या साध्या गोष्टी.. थॅँक्यू, वेलकम, सॉरी.. हे किती साधे शब्द.. पण आपण ते घरात किती वेळा वापरतो? आपलं चुकलं तर किती वेळा ते आपण मान्य करतो, प्रत्येक लहान सहान गोष्टीत किती वेळा आपण दुसºयाचे आभार मानतो? आपण जर या गोष्टी करीत असलो, तर मुलंही आपोआपच या गोष्टी शिकतात.३- वाचनसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी मुलं वाचनातून शिकतात. मुलांना अगदी वाचता येत नसलं तरी त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवणं, त्याचा अर्थ सांगतानाच, त्यांना गंमतही वाटेल अशा पुस्तकांची निवड करणं, पुस्तकं कायम मुलांच्या अवतीभोवती असतील असं वातावरण निर्माण करणं, आपण स्वत:ही त्यात रमणं.. या गोष्टी मुलांवर उत्तम संस्कार करतात. अनेक गोष्टी आज इंटरनेट, टीव्हीवर उपलब्ध असल्या, तरी त्यासोबत वाचनाची गोडीही मुलांना लावणं महत्त्वाचं आहे.४- आपलं मूल प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे जे आपल्याला मिळालं नाही, ती ती प्रत्येक गोष्ट आपल्या मुलाला मिळाली पाहिजे असंही अनेक पालकांना वाटत असतं, त्यात वाईट काही नाही, पण ‘नकाराचा’ अर्थही मुलांना समजला पाहिजे. कोणती गोष्ट आपल्याला मिळेल आणि कितीही हट्ट धरला तरी एखादी गोष्ट मिळणार नाही म्हणजे नाही, हेही मुलांना कळलं पाहिजे. पण त्या ‘नाही’मध्येही तारतम्य असलं पाहिजे.अशा या काही साध्या, सोप्या गोष्टी, त्या आपण स्वत: करतानाच मुलांमध्येही त्याची आवड निर्माण करता येते. चांगल्या सवयी अशा आपोआप अंगी बानवल्या जातात. त्या कुठे विकत मिळत नाहीत आणि त्यासाठी शोधाशोधही करावी लागत नाही. त्या आपल्याच आसपास विखुरलेल्या असतात..