कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे, पर्सनल स्पेस. त्याचबरोबर एकमेकांना वेळ देणं. पण त्याचबरोबर ही गोष्टही लक्षात घेणं गरजेचं असतं की, जर आपण एखाद्या व्यक्तीला कमिटमेंट देतो म्हणजे, याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही तुमच्या पार्टनरला खूश करण्यासाठी स्वतःच्या गोष्टींशी तडजोड करावी.
खरं तर प्रेमात पार्टनरसोबत वेळ घावलणं सर्वांनाच चांगलं वाटत असतं. सगळेच एकमेकांच्या पसंत-नापसंतीची काळजी घेतात. पण अनेकदा ही काळजी घेणं इतकं वाढतं की, तुम्ही तुमची खाजगी स्पेसही गमावू लागता. याला ओवर डिपेंडेंट रिलेशनशिप(Over-dependent relationship) म्हटलं जातं.
अशातच नात्यामध्ये असणाऱ्या दोन्ही व्यक्तींना एकमेकांच्या भावनांचा आदार करणं आवश्यक असतं. अशातच अशा पार्टनरची निवड करा, जो तुमच्या पर्सन स्पेसला महत्त्व देईल आणि तुम्हाला समजून घेईल. जर तुम्हाला स्वतःलाही माहीत नसेल की, रिलेशनशिपमध्ये पर्सनल स्पेस कशी मेन्टेन करावी तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर...
आठवड्यातून एक दिवस नक्की स्वतःसाठी द्या
आठवड्यामध्ये कमीत कमी एक दिवस स्वतःसाठी द्या. तुम्हाल त्यादिवशी शॉपिंग करण्यासाठी जाऊ शकता. किंवा तुमच्या आवडीचं काम करू शकता.
तुमच्या छंदाकडे लक्ष द्या
नात्यामध्ये येण्याआधी तुमचे काही छंद असतील. तुम्ही डान्स करत असाल तर एखादं इन्ट्रुमेंट वाजवत असाल. नात्यामध्ये आल्यानंतर तुमची ही आवड जपण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या जपण्याचा प्रयत्न करा.
घरातच शोधा वेगळी जागा
घरामध्ये तुम्हा दोघांसाठी एक वेगळी जागा असणं गरजेचं आहे. जिथे आठवड्यातील एक दिवस तुमचाच असेल. याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्ही तुमच्या पार्टनरपासून वेगळे होत आहात. असं करणं यासाठी आवश्यक असतं. जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकाल. तुम्ही गाणी ऐकू शकाल किंवा दुसरी कामं करू शकाल.
अजिबात निराश होऊ नका
जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर इतर कोणी का तुमची काळजी घेईल. त्यामुळे स्वतःचा विचार करून अजिबात निराश होऊ नका. स्वतःसाठी जे उत्तम असेल ते नक्की करा. स्वतःची काळजी घ्या.
पार्टनसोबत मोकळेपणाने बोला
एखाद्या सफल रिलेशनशिपसाठी कम्युनिकेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पार्टनरला सांगा की, तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस पाहिजे. ही गोष्ट स्वतःच्या मनात ठेवू नका. जर तुमचं नातं मजबुत असेल तर तुमच्या पार्टनरच्या भावनांची कदर करा.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)