बालू-लिओ-शेरेची अद्भूत मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2016 11:13 AM
अमिरिकेतल्या जॉर्जिया इथल्या ‘नोहझ आर्क’ प्राणी संग्रहालयात हे दृश्यं दिसते आहे.
एकाच जगंलात वाघ, सिंह आणि अस्वल एकत्र राहू शकत नाही हे आपण ऐकलेच आहे. मात्र अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळत आहेत. अमिरिकेतल्या जॉर्जिया इथल्या ‘नोहझ आर्क’ प्राणी संग्रहालयात हे दृश्यं दिसते आहे. या प्राणीसंग्रहालयात एक अस्वल, सिंह आणि वाघ एकत्रच राहतात, खातात, खेळतात आणि झोपतातही एकत्रच. यांपैकी अस्वलाचे नाव बालू, सिंहाचे नाव लिओ तर वाघाचे नाव शेरे असे आहे. 2001 साली हे तिघेही छोटे छोटे बछडे असताना त्यांना या संग्रहालयात आणण्यात आले होते.पोलिसांनी टाकलेल्या एका धाडीत त्यांना एका ड्रग हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले होते. या तिघांच्या मैत्रीचा हा अनोखा व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसतोय.