बेक्रअप कधीही कुणासाठीही सोपं नसतं. तुमच्या भावना दुखावल्या जातात. अनेक प्रश्न मनाला पडतात आणि बदला घेण्याची भावना तुमच्या नात्याला नेहमीसाठी बुरशी लावून जाते. तसं तर अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, तुमचं ब्रेकअप झाल्यास तुमच्या आत दडवून ठेवलेल्या राग, मत्सर, द्वेषामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच नकारात्मक विचारांना सोडून तुमच्या एक्ससोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. याने तुमचाच फायदा होईल.
रिसर्चमध्ये समोर आलं आहे की, कुणाची चूक माफ केल्याने तुमचं आरोग्य अधिक चांगलं होतं. तुमचं हृदय आरोग्यदायी राहतं. कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी राहते, चांगली झोप येते, ब्लड प्रेशन कंट्रोल राहतं, तणाव, स्ट्रेस नाहीसा होतो. सोबतच यामुळे आयुष्यही वाढतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला क्षमा करा आणि त्याच्या चुका विसरून जा. याने तुमचं डोकं शांत होईल.
या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू पण तुमच्या एक्सचं तुमच्या जीवनात काही ना काही, कधी ना कधी महत्व होतं. जी व्यक्ती कधी तुमच्या जीवनात महत्वाची होती, ज्यासोबत तुम्ही जीवनातील अनेक महत्वाचे क्षण घावलले होते. त्या सगळ्या आठवणींना एकाएकी नष्ट करणे शक्य नाही. नात्याचा असा कटू अंत जीवनाला बेरंग करू शकतो. त्यामुळेच आपल्या एक्सच्या संपर्कात रहा जेणेकरून त्या आठवणी तुमच्या जीवनात यादगार राहतील.
कित्येकदा पार्टनरसोबत ब्रेकअप करण्याचा अर्थ त्या सर्व मित्रांशी ब्रेकअप करणं जे तुमचे कॉमन फ्रेन्ड होते. तशी ही स्थिती सर्वांसाठीच कठिण आणि विचित्र असते. पण जर तुम्ही तुमच्या एक्ससोबत समजून-जाणून ब्रेकअप केल्यास आणि मैत्री ठेवल्यास त्या मित्रांनाही गमवण्याची शक्यता कमीच असते.
जर तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये राहिले असाल आणि तुम्हाला माहिती असेल की, तुमच्या एक्सपेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कुणीही समजू शकत नाही. अशात तुमच्या मनात त्याच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. याचा अर्थ तुम्ही चांगले मित्र होऊ शकता. जीवनात कधी कुणाशी काम पडेल सांगता येत नाही. अशात एक्स तर तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो. त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे अधिक फायद्याचेच आहे.
जर दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर सारखे तुम्ही दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करत असाल तर शक्यता आहे की, तुम्हाला पुढे सोबतही काम करावं लागेल. त्यामुळे जुन्या गोष्टींना विसरून किंवा चांगली आठवण केवळ लक्षात ठेवून राग मनातून काढून टाकणे. अशात केवळ तुम्ही कपल नाहीत म्हणून आपलं करिअर धोक्यात टाकणं हे पण शहाणपणाचं नसेल.