बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच सात जन्मांसाठी एक होणार आहेत. म्हणजेच ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्या सगळीकडेच त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. तशा तर बॉलिवूडमधील कितीतरी लव्हस्टोरीज सतत चर्चेत असतात. पण रणवीर आणि दीपिका या दोघांची लव्हस्टोरी फारच वेगळी आणि खास आहे. अनेक प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी ही जोडी आयकॉन झाली आहे.
गेल्या ६ वर्षांपासून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटलेले आहेत. 'रामलीला' या सिनेमापासून त्यांची जवळीक वाढली आणि ते आता नेहमीसाठी एक होणार आहेत. या जोडीच्या रिलेशनशिपची खासियत म्हणजे सहा वर्ष एकत्र असूनही त्यांचं एकमेकांप्रती आकर्षण, प्रेम आणि विश्वास तसाच कायम आहे. जर तुम्हालाही असंच रिलेशनशिप हवं असेल किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये नव्याने रोमांच आणायचा असेल तर दीपिका आणि रणवीरच्या रिलेशनशिपमधील काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.
१) दीपिका आणि रणवीरच्या रिलेशनशिपची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते दोघेही एकमेकांच्या फॅमिलीमध्ये इंटरेस्ट दाखवतात. वेळ काढून आपल्या पार्टनरच्या मित्रांना आणि परिवारातील सदस्यांना भेटतात. त्यामुळे तुम्ही असे करुन तुमचं नातं आणखी मजबूत करु शकता. याने तुमचं सोशल आणि फॅमिली रिलेशन आणखी मजबूत होतं. सोबत नात्यामध्ये नवा विश्वास निर्माण होतो.
२) आकर्षण केवळ प्रेमाच्या सुरुवातीलाच नाही तर नात्यात नेहमीच कामी येतं. कारण हे विसरुन चालणार नाही की, प्रेमाचा पाया हा आकर्षणच आहे. रिलेशनशिपमध्ये काही वर्षांनी लोक हे विसरुन जातात आणि आपल्या पार्टनरला सामान्यपणे ट्रिट करु लागतात. याने नातं कमजोर होतं. त्यामुळे दीपिका आणि रणवीरप्रमाणे आपलं आकर्षण कायम ठेवा.
३) अनेकजण हे यशस्वी लग्नाचं गणित आर्थिक रुपाने समृद्ध असण्याशी जोडतात. हे काही प्रमाणात खरही आहे. पण हे गरजेचे नाहीये. यशस्वी लग्नाचं गुपित हे तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देणे हे आहे. जसं जमेल तसं पार्टनरसाठी वेळ काढणं हे कोणत्याही नात्याला मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं आहे.
४) जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा त्या व्यक्ती एखादी सवय तुम्हाला फार आवडायला लागते. पण काही वर्षांनी नात्यांना सांभाळण्याच्या धावपळीत पार्टनरची ती सवय हरवून जाते. अचानक एखाद्यावेळी पार्टनरला त्यांची ती सवय आठवण करुन द्या. याने तुमच्या पार्टनरला चांगलं वाटेल.
५) अनेकदा काही कारणांमुळे पार्टनर एकमेकांच्या विपरीत असण्याने आणि विचारही वेगळे असल्याने जवळ येऊ शकत नाहीत. लग्नाआधी अशा काही गोष्टींवर त्यांचं लक्षही जात नाही. अशात हे गरजेचं असतं की, दोघांनीही एकमेकांच्या विचारांचा सन्मान करावा आणि एकमेकांना समजून घ्यावं.
६) रिलेशनशिपमध्ये असल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या संपत नाही तर त्या वाढतात. जबाबदाऱ्यांचं ओझं वाहत असताना दोघांमधील प्रेम कुठे हरवून जाऊ नये यासाठी प्रयत्न करत रहावे. थोडा वेळ काढून दोघांनी फिरायला जावे किंवा बाहेर डिनरला जावे.
७) जर दोघेही वर्कींग असतील तर अर्थातच दोघांकडेही वेळेची कमतरता असेल. ही वेळेची कमतरताच नात्यातील चमक नाहीशी होते. त्यामुळे पार्टनरसाठी वेळ काढण्याची कारणे शोधायला हवीत. असे केले तर दोघांचीही जवळीकता कायम राहील.