काच फोडल्यास 3 मिलिअन डॉलरचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2016 3:19 PM
कॅनडाच्या बसस्थानकावर येणारा प्रत्येकच व्यक्ती ही काच फ ोडून ते पैसे घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
बस स्थानकावर एका काचेच्या बॉक्समध्ये 3 मिलिअन डॉलर ठेवले असतील. शिवाय ती काच फोडून तुम्ही ही रक्कम घरी घेऊन जाऊ शकता असे लिहिले असेल तर तुम्ही नक्कीच ती काच फोडण्याचा प्रयत्न कराल.कॅनडाच्या बसस्थानकावर येणारा प्रत्येकच व्यक्ती ही काच फ ोडून ते पैसे घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आतापर्यंत एकाही व्यक्तीला यात यश आले नाही. बुलेटप्रुफ ग्लास बनविणाºया कंपनीने आपली जाहिरात करण्यासाठी ही शक्कल लढविली आहे.काच फोडण्याचा प्रयत्न करणाºया अनेक व्यक्तींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या स्थानकावर एवढी मोठी रक्कम पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात. मात्र यात केवळ 500 डॉलर रुपयेच ठेवण्यात आले आहे. बाकी बनावटी नोटा त्यात ठेवण्यात आल्या आहेत.मागील वर्षी ही जाहिरात लावण्यात आली होती तेव्हापासून ही रक्कम मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत, मात्र यात फोडणाºयांनाच इजा झाली.