एक काळ होता जेव्हा कपलच्या लग्नाचे फोटो केवळ त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि कुटूंबातील लोक वेडिंग अल्बम किंवा सीडीवर बघायचे. पण आता इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियात साइट्सच्या माध्यमातून लग्नाचे फोटो सर्वांसोबत शेअर केले जात आहेत. ज्याला 'इन्स्टावर्थ' असं नाव देण्यात आलं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, हे 'इन्स्टावर्थ' वेडिंग करणाऱ्या कपल्ससाठी टेंशनचं कारण ठरत आहे. चला जाणून घेऊ कसं...
३० टक्के वाढतोय खर्च
या सर्व्हेनुसार, इन्स्टावर्थ वेडिंग म्हणजे सोशल मीडियात फोटो अपलोड करण्याचा नादात कपल्स लग्नात फार जास्त खर्च करत आहेत. जेणेकरून त्यांच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर लोकांना पसंत पडले पाहिजे. सर्व्हेनुसार, एक चतुर्थांश कपल्सनी साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत त्यांच्या बजेटपेक्षा ३० टक्के अधिक खर्च केला.
लाइक्सची लालसा
फोटो काढला आणि लगेच सोशल मीडियावर अपलोड केला, ही कॉन्सेप्ट लोकांना अलिकडे अधिक भावते आहे. आणि याचमुळे 'इन्स्टावर्थ' वेडिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांचं मत आहे की, फोटो शेअर करण्याची खरी मजा सोशल मीडियातच आहे. फोटो शेअर करताच लाइक्स सुरू होतात. आपल्या लोकांसोबतचे आपले फोटो लगेच शेअर करण्यात खरी मजा आहे.
बॉलिवूडला कपल्स करतात फॉलो
इन्स्टावर्थ वेडिंग जास्त प्रमाणात बॉलिवूडने इन्स्पायर्ड आहे. अभिनेत्री दीपिका पाडुकोन, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले होते. एकीकडे लग्नाचा समारंभ सुरू आहे आणि तिकडे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यांचा हा ट्रेन्ड लोकांना चांगलाच आवडला होता आणि त्यामुळेच लोक त्यांना फॉलो करत आहेत. सर्व्हेनुसार, इन्स्टावर्थ वेडिंग करणाऱ्या कपल्सची संख्या दिवसेंदिवस २ ते ३ टक्क्यांनी वाढत आहे.
लोकेशनचा वाढतोय खर्च
सर्व्हेनुसार, खाणं आणि ड्रिंक्सनंतर लोकेशनवर सर्वात जास्त खर्च केला जात आहे. आकडेवारी नजर टाकली तर साखरपुड्याची अंगठी आणि हनीमूनपेक्षा जास्त खर्च कपल्स लोकेशनवर करत आहेत. अर्थातच लोकेशन चांगलं असेल तर फोटो चांगले येतील. मंडपासाठीही वेगवेगळ्या थीमचा वापर केला जातो.
समजदारपणा घ्या
(Image Credit : businesstoday.in)
तुमच्यासाठी तुमच्या लग्नाचा दिवस अर्थातच खास असेल, पण हे इतर जगासाठी महत्वपूर्ण नाहीये. त्यामुळे जर तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही एकापाठी एक तुमच्या लग्नाचे फोटो शेअर करत रहाल तर हे इतरांसाठी थोडं इरिटेटींग होऊ शकतं. तज्ज्ञ सांगतात की, लोकांना हे कळत नाहीये की, त्यांनी दुसऱ्यांसोबत काय शेअर करावं आणि काय करू नये. नेहमीच लोक त्यांच्या छोट्या छोट्या अॅक्टिविटी सोशल मीडियावर शेअर करतात आणि दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांची वाट बघतात. सोशल मीडिया असं आहे की, तुम्ही याचा समजदारीने वापर केला नाही तर तुमचा तणाव वाढत जाणार.