(Image Credit : www.rd.com)
डेटिंग प्रत्येक सिंगल मुलासाठी आणि मुलीसाठी एक आकर्षक शब्द आहे. तसच प्रत्येकजण हा आपली डेट यादगार करण्याच्या प्रयत्न करत असतो. अशात तुमच्या आजूबाजूचे लोकही डेटिंगसाठी तुम्हाला वेगवेगळे सल्ले देत असतात. खासकरुन मित्रमैत्रिणी असे सल्ले जास्त देतात. पण जर तुमची मैत्रीण कुणाला डेट करत असेल आणि तिच्या सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगत असेल तर तुमचं कर्तव्य ठरतं की, तुम्ही योग्य सल्ला द्यावा. पण काही चुकीच्या सल्ल्यांमुळे तुमची मैत्रीण अडचणीत येऊ शकते. त्यामुळे काय सल्ले देऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
१) वजन कमी केल्याने बॉयफ्रेन्ड लगेच मिळेल
चांगलं आणि फिट दिसणं प्रत्येकासाठीच फायद्याचं असतं. याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. पण कुणाला दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी स्वत:ला बदलण्याची गरज नाहीये. अशाप्रकारचा सल्ला देणे चुकीचे आहे. कारण ज्या व्यक्तीला तुमच्यासोबतच डेटला जायचंय. त्याने तुमचा आहे तसा स्विकार करायला हवा.
२) जो सुंदर असेल त्याच्यासोबतच डेटला जा!
मुलांप्रमाणे मुलीही रंग-रुपाला महत्त्व देतात. पण जास्त स्मार्ट दिसण्याच्या नादात मुलं नेहमीच बडेजाव करतात. जर तुम्ही तुमच्या मैत्रीणीला अशा मुलासोबत डेटला जाण्याचा सल्ला देत असाल तर हे चुकीचं ठरु शकतं. कारण सुंदरतेपेक्षा समोरच्या व्यक्तीचं वागणं आणि त्याचं मन अधिक सुंदर असायला हवं. कारण चेहऱ्याची सुंदरता फार काळ टिकत नाही.
३) अशा मुलासोबत डेटला जा, जो तुझ्यावर पैसे खर्च करेल
अनेक मुली असं मानतात की, डेटिंगला गेल्यावर पार्टनरने गिफ्ट द्यावं आणि इतकडे-तिकडे फिरवावं. कधी कधी असं करणं चांगलंही असतं. पण केवळ तो पैसा खर्च करतो म्हणून त्याला डेट कर असं म्हणणं चुकीचं आहे. हा सल्ला अजिबात प्रॅक्टिकल नाहीये.