(Image Credit : More)
जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलच्या एक रिपोर्टनुसार, मॅट्रिमोनिअल साइट्सवर जोडीदार शोधण्यापेक्षा डेटिंग साइट्सवर पार्टनर शोधणं भारतीय लोक जास्त पसंत करत आहेत. 'इअर इन सर्च-इंडिया - इनसाइट्स फॉर ब्रॅड्स' हा गुगलचा रिपोर्ट समोर आला आहे. यातून समोर आलं की, इंटरनेटच्या माध्यमातून डेटिंग पार्टनर शोधणं ४० टक्क्यांनी वाढलं आहे. तर मॅट्रिमोनिअल साइट्सच्या माध्यमातून इंटरनेटवर लग्नासाठी व्यक्ती शोधण्यात केवळ १३ टक्के इतकीच वाढ झाली आहे.
लोक काय म्हणाले सर्व्हेत?
(Image Credit : DXSCOM)
आताही डिजिटल विश्वात डेटिंग पार्टनर शोधण्याच्या तुलनेत लग्नासाठी व्यक्ती शोधणं तीन पटीने वाढलं आहे. पण ज्या प्रकारे भारतीय यूजर्समध्ये डेटिंगची क्रेझ वाढत आहे, ती बघून असं वाटतं की, काही वर्षांमध्ये हा ट्रेंड लाइफ पार्टनर शोधण्याच्या ट्रेंडला मागे टाकेल. गुगलचं हे निरीक्षण भारत मॅट्रिमनी साइटच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चचं समर्थन करतं. ज्यात म्हटलं गेले होतं की, एक सामान्य भारतीय हळूहळू फार भावूक होत चालला आहे. या सर्व्हेत सहभागी ६ हजार भारतीयांपैकी ९२ टक्के लोकांचं म्हणणं होतं की, ते प्रेमाच्या शोधात आहेत.
प्रेम व्यक्त करण्यासाठी 'हे' करतात लोक
(Image Credit : Diabetes UK)
या सर्व्हेमधून ही बाब समोर आली की, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी २४ टक्के भारतीय शब्दांचा वापर करतात, २१ टक्के भारतीय रोमॅंटिक डिनरच्या माध्यमातून व्यक्त करतात, ३४ टक्के लोक गिफ्ट्स देऊन तर १५ टक्के लोक रोमॅंटिक हॉलिडे प्लॅनिंग करून आपल्या पार्टनरप्रति प्रेम व्यक्त करतात. एक आणखी आश्चर्यकारक बाब यातून समोर आली की, केवळ डेटिंग कपल्सच व्हॅलेंटाइन डे साजरा करत नाही तर सर्व्हेत सहभागी ८६ लोकांचं म्हणणं होतं की, त्यांना लग्नानंतरही व्हॅलेंटाइन डे साजरा करायचा आहे.
फूड डिलिव्हरी काय नंबर १
केवळ प्रेमच नाही तर भारतीयांना बाहेरच्या खाण्याचीही आवड आहे. हे २०१८ मध्ये फूडसंबंधी सर्चमध्ये दुप्पट वाढ झाली यावरून दिसून येतं. या रिसर्चमधून आढळलं की, स्विगी, झोमॅटो आणि दुसरे फूड डिलिव्हरी ब्रॅन्ड्स वेगाने पुढे जात आहेत. ऑनलाइन फूडमध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्या पदार्थात पिझ्झा हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.