शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

सोबत आहात पण नात्यात जोश किंवा इंटरेस्ट नाही? तर 'या' कारणाने लैंगिक जीवन संपलंच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 1:06 PM

Relationship Tips : असे बरेच कपल असतात जे कपल लग्नाआधी जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहिले असतील नंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये कडवटपणा येऊ शकतो. 

Relationship Tips :  कोणत्याही कपलच्या आयुष्यात लैंगिक जीवन सुरळीत असणं फार गरजेचं आहे. हा नात्याचा एक महत्वाचा आधार असतो. पण सगळ्याच कपलचं लैंगिक जीवन चांगलं सुरू असेल असं नाही. असे बरेच कपल असतात जे कपल लग्नाआधी जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहिले असतील तर नंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये कडवटपणा येऊ शकतो. 

हा फार गंभीर आणि महत्वाचा विषय आहे. नात्यातील या बदलाची कारणेही वेगवेगळी असू शकतात. म्हणजे पार्टनरबाबत कमी आकर्षण, तणाव, जबाबदाऱ्यांचं ओझं किंवा शारीरिक संबंधातील इंटरेस्ट कमी होणं इत्यादी.

अनेकदा तर असंही बघायला मिळतं की, एक पार्टनर लैंगिक जीवन सुधारण्यासाठी जमेल ते प्रयत्न करतात, पण दुसरा पार्टनर कशातही इंटरेस्ट घेत नाही किंवा स्वत: काहीच प्रयत्न करत नाही. याचा परिणाम असा होतो की, असे कपल्स चिडचिडपणाचे शिकार होतात. अशा रिलेशनशिपला 'डेड बेडरूम रिलेशनशिप' असं म्हटलं जातं.

डेड बेडरूम रिलेशनशिप म्हणजे काय?

काही रिसर्चनुसार, डेड बेडरूम हे एक असं रिलेशनशिप असतं ज्यात कपल वर्षभरातून केवळ ६ वेळा किंवा त्यापेक्षा कमी वेळा इंटिमेट होतात किंवा शारीरिक संबंध ठेवतात. पण डेड बेडरूम रिलेशनशिप असणं किंवा नसणं हे कपलच्या सेक्शुअल प्रवृत्तीवर अवलंबून असतं. जसे की, असंही असू शकतं की, काही कपल्सना आठवड्यातून केवळ एकच दिवस शारीरिक संबंध पसंत असेल.

काय असतात कारणे?

डेड बेडरूम रिलेशनशिपसाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात आणि यातील मुख्य कारणं म्हणजे तणाव आणि वाढत्या जबाबदाऱ्या इत्यादी. या कारणांमुळे पार्टनरचा शारीरिक संबंधातील इंटरेस्ट कमी होतो. अनेकदा ही स्थिती व्यक्तींना डिप्रेशनमध्ये घेऊन जाते. बाळ झाल्यावरही लैंगिक जीवनात अनेक बदल होतात. त्याशिवाय आजकाल अनहेल्दी लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही कामेच्छा कमी होते. नंतर हेच डेड बेडरूम रिलेशनशिपचं कारण ठरतं. 

कसा कराल बचाव?

लैंगिक जीवन सुधारण्यासाठी, रोमांचक आणि रोमॅंटिक करण्यासाठी गरजेचं आहे की, पार्टनर्सने एकमेकांशी बोलावं. त्यांना ज्या समस्या असतील त्या त्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर कराव्या. सोबतच पार्टनरला याची जाणीव करून द्या की, तुम्ही कोणत्याही स्थितीत त्यांच्यासोबत आहात. वेळ काढून कुठेतरी फिरायला जा. तणाव कमी करून शांत राहण्याचा प्रयत्न करा. याने तुमचं लैंगिक जीवन सुधारण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप