शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 11:22 AM

चॅटिंग किंवा कामाच्या फोनचा अडसर न होऊ देता तुम्ही तुमच्या आईसोबत किती दिवसांआधी वेळ घालवला होता? तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं कधी तिला स्पेशली फोन विचारलं की, आई कशी आहेस?

(Image Credit : florida-elderlaw.com)

चॅटिंग किंवा कामाच्या फोनचा अडसर न होऊ देता तुम्ही तुमच्या आईसोबत किती दिवसांआधी वेळ घालवला होता? तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं कधी तिला स्पेशली फोन विचारलं की, आई कशी आहेस? किंवा कसं सुरु आहे? शेवटचं कधी तुम्ही आईसोबत चहाचे घोट घेत जीवनाबाबत किंवा भविष्याबाबत गप्पा केल्या? जर हे प्रश्न विचारल्यावर लगेच तुम्हाला दिवस आठवत नसेल तर ही गोष्ट करुन फार काळ लोटला असेल असे गृहीत धरुया. 

आपल्यापैकी अनेकजण जीवनाच्या धावपळीत इतके बिझी झाले आहेत की, त्यांच्या हेही लक्षात येत नाही की आपले आई-वडील आता वृद्ध होत आहे. शेवटची कधी तुम्ही केवळ आईसाठी वेळ घालवण्यासाठी मिटींग कॅन्सल हेही अनेकांना आठवत नसेल. 

आई वृद्ध होतीये...

धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आणि कामाच्या वाढत्या बोझामुळे आपण हे विसरुनच जातो की, घड्याळाचे काटे सतत फिरत आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत आईचं वयही वाढत आहे. रोज सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक नवीन सुरकुती आलेली असते. तुमचा हात धरुन घराचे तीन माळे झरकन चढून जाणाऱ्या तुमच्या आईला आता हेच तीन माळे चढताना ब्रेक घ्यावा लागतो.  

जरा वेळ काढून तुम्ही तुमच्या आईकडे निट बघाल तर तिच्यात झालेले शारीरिक बदल पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. पण तितका वेळ कुणाकडे नाहीये. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, असं काही आहे जे करुन तुम्ही तुमच्या आईचं आयुष्य वाढवू शकता. तर तुम्ही काय कराल? आनंदाने अनेकजण ही गोष्ट आईसाठी नक्की करतील, असं गृहीत धरुन चालूया.

काय आहे रिसर्च?

यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये २०१२ साली करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या वयोवृद्धांना चांगली साथ मिळते, सहकार्य मिळतं, ते एकटेपणा सोसत असलेल्या लोकांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. हा रिसर्च १६०० वयोवृद्धांवर करण्यात आला आणि त्यांच्या सोशल संवादाचं निरीक्षण करण्यात आलं. 

काय निघाला निष्कर्ष?

या रिसर्चमधून हे समोर आलं की, एकटेपणा सोसत असलेल्या वयोवृद्धांचं आरोग्य ढासळत आहे. एकटेपणामुळे वृद्धांचं राहणीमानंच खालावत नाही तर याने त्यांचं वजन वाढण्याचा आणि डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका वाढतो. तसेच त्यांचा वेळेआधी मृत्यूही होऊ शकतो. एकटेपणा हा कुणालाही निराश करणाराच असतो, पण याचा वाईट प्रभाव वयोवृद्धांवर अधिक बघायला मिळतो. AARP फाऊंडेशननुसार, दिवसाला १५ सिगारेटी ओढल्याने जेवढा प्रभाव आरोग्यावर पडतो, तेवढाच एकटेपणाही तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव करतो.

तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारी लोकं असतात, तुम्ही सतत हसत असता तेव्हा हे तुमच्यासाठी एकप्रकारे औषधच ठरतं. मग वाट कसली बघताय लगेच फोन उचला आणि आईला फोन करा. तसेच थोडा जास्त वेळ काढून तिला भेटा आणि तिच्याशी गप्पा करा. याने नक्कीच त्यांना फायदा होईल. पण यावेळी नेहमीसारखं न भेटता वेगळ्याप्रकारे भेटा.

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधनMothers Dayजागतिक मातृदिनWomenमहिला