प्रेमात पडणं हे प्रत्येकासाठीच एक स्वप्न असतं. प्रेमात पडल्यावर प्रत्येकाचं आयुष्य बदललं जातं. तुम्हाला कुणाची काळजी वाटायला लागते, त्या व्यक्तीचा आनंद, त्या व्यक्तीचं दु:खं तुम्हाला आपलसं वाटायला लागतं. स्वत:ला विसरून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागता. पण ती व्यक्ति जर चुकीची असेल तर तुमचं मात्र काही खरं नसतं. स्वप्न पूर्ण होण्याऎवजी स्वप्ने तुटायला लागतात. म्हणूनच अशा काही व्यक्तींची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यांना चुकूनही डेट करू नका.
१) खोटे बोलणारे:
जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्हाला वाटत असतं की, तुम्ही त्या व्यक्तीला बदलू शकता. पण खरं हे आहे की, खोटा व्यक्ती कधीही बदलू शकत नाही. तो व्यक्ति कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुमच्याशी खोट बोलणार आणि दगा देत राहणार. कधी कधी तर त्याचं खोट बोलणं तुम्हालाही माहिती पडणार नाही. अशा व्यक्तीसोबत आयुष्यातील सर्व स्वप्न बघणं जरा जास्तच अवघड आहे.
२) नाटकी व्यक्ती:
प्रत्येक गोष्टीत काहीतरी मागणी करत राहणारा…सतत कारणे देणारा…व्यक्ती कधीही विश्वास ठेवण्यालायक नसतो. असे व्यक्ती नेहमीच खोट बोलून दूर पळत असतात. अशा व्यक्तीसोबत तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही.
३) जे तुम्हाला बदलण्याचा विचार करतात
तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला न स्विकारता तुमच्यात बदल घडवू पाहणा-या व्यक्तीसोबत चुकूनही डेटवर जाऊ नका. तुम्ही जसे आहात तसेच त्याने स्विकारायला हवे. प्रत्येक गोष्टी जी व्यक्ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती तुमच्यावर प्रेमच करत नाही. जर त्या व्यक्तीला खरंच तुमच्यावर प्रेम असेल तर त्याने तुम्ही आहात तसा स्विकार करायला हवा.
४) विचारांना महत्व न देणारे:
प्रेमात दोघांचंही नातं सारखंच असतं. तरीही जर तुमचा/तुमची पार्टनर तुमच्या विचारांना महत्व देत नसेल, तर मग तुम्ही लगेच या नात्याबद्दल विचार करायला हवा. ऎकमेकांच्या विचारांना महत्व देणे हे प्रेमात खूप महत्वाचं असतं. माझं एकट्याचंच किंवा एकटीचच खरं आहे, तू म्हणातो ते चुकीचं आहे, असा विचार करणा-या व्यक्तीसोबत आयुष्य आनंदाने कधीही जगता येणार नाही.
५) ज्यांना सॉरीचा अर्थ समजत नाही
तुम्ही अशा व्यक्ती सोबत तर चुकूनही राहू नका ज्यांना सॉरी या शब्दाचा अर्थही माहिती नसतो. अशा व्यक्ती आयुष्यभर डोक्याला ताप ठरू शकतात. अशा व्यक्तीला सॉरी म्हणता म्हणता तुमचं आयुष्य जाईल. त्याला त्याच्या चुकींचीही जाणिव व्हायला हवी.
६) कन्फ्यूज व्यक्ती:
ज्या व्यक्तीला आयुष्यात काय करायचं आहे, हे महिती नाही किंवा जी व्यक्ती सतत प्रत्येक गोष्टीत कन्फ्यूज असते अशा व्यक्तीसोबत आयुष्य काढणं खूप अवघड होऊ शकतं. ज्या व्यक्तीला काय करायचं आहे हेच समजत नसेल तर ती व्यक्ती परिवाराला कशी चालवणार…
७) महिलांचा सन्मान न करणारे:
जे व्यक्ती तुमचा सन्मान करतात पण दुस-या व्यक्तींचा मान-सन्मान ठेवत नाहीत, अशांच्या चार हात दूरच राहिलेले बरे. अशा व्यक्तींना जराही जवळ करता कामा नये. जे व्यक्ती महिलांचा सन्मान करू शकत नाही ते पुढे चालून तुमचाही सन्मान करणार हे कशावरून?