लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबाबत मुलगा आणि मुलगी दोघांनाही उत्सुकता असते. दोघांनी वेगवेगळी स्वप्ने रंगवलेली असतात. प्रत्येकालाच आपली पहिली रात्र यादगार करायची असते. मात्र अनेकजण आपल्या उत्सुकतेच्या नादात पहिली रात्र खराब करतात. लग्नाच्या पहिल्या रात्री काय करु नये अशा 5 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1) भूतकाळाबाबत सगळं सांगू नका
अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरसोबत सहज झाल्यावर आपल्या भूतकाळातीस एक एक घटना सांगायला लागतात. काही लोक फारच पुढे जाऊन आपल्या आधीच्या रिलेशनशिपबाबतही सांगतात. खरंतर असं कसं करणं तुमच्या भविष्यासाठी महागात पडू शकतं. त्यामुळे कधीही लग्नानंतरच्या पहिल्या रात्री चुकूनही आपल्या भूतकाळाबाबत सांगू नका. आपल्याला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे त्याला भूतकाळाबाबत सांगणं चुकीचं नाहीये, पण पहिली रात्र योग्य वेळ नाही.
2) कूटुंबियांच्या तक्रारी करु नये
लग्न म्हटलं की, कितीतरी कामं असतात. कितीही प्रयत्न करुन काहीना काही कमतरता राहून जाते. काही चुका मुलींच्या कूटुंबियांकडून होतात तर काही चुका मुलांच्यां कूटुंबियांकडून होतात. पण कूटुंबियांच्या या चुकांबाबत किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याबाबत पहिल्या रात्री काही बोलू नका. यामुळे पहिल्याच रात्री दोघांनाही निराशा येऊ शकते.
3) शारीरिक संबंधासाठी घाई नको
लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हावे असे गरजेचे नाहीये. पहिल्या रात्री दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा करणेही आवश्यक आहे. दोघेही अनोळखी असल्याने आधी एकमेकांना जाणून घ्या. तरच पुढे तुम्ही चांगलं लैंगिक आयुष्य जगू शकाल.
4) पहिल्याच रात्री तक्रारी करु नका
बोलता बोलता असंही होऊ शकतं की, तुम्हाला तुमच्या पार्टनरची एखादी गोष्ट आवडली नसेल. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री एकमेकांमधील खोट काढणं, एकमेकांना चुकीचं ठरवणं जरा घाईचं होईल.
5) एकमेकांचं ऐका
लग्नाच्या रात्री उत्साहाच्या भरात केवळ तुम्हील बोलू नका. तुमच्या पार्टनरचंही ऐका. तिला काय आवडतं, तिचं काय म्हणनं आहे हेही जाणून घ्या. केवळ तुम्ही बोलत रहाल तर तुमच्या पार्टनरला सहज होण्याची संधी मिळणार नाही.