- मयूर पठाडेमूल कोणत्याही प्रकारचं असो, बुद्धिमान, सर्वसाधारण किंवा गतिमंद. पालकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. जेव्हा मूल कमी बुद्धिमान असेल, त्याची आकलनक्षमता, आयक्यू जर कमी असेल, अशावेळी तर पालकांची कसोटीच लागते. त्यामुळे आपलं मूल कसं आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार मग प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या मुलाचा आयक्यू जर सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी असेल तर पालकांना मग जास्तच जागरूक राहावं लागतं.त्यासाठी काय करायचं? सर्वच पालकांसाठी, त्यातही कमी आकलनक्षमता असलेल्या मुलांसाठी खाली दिलेल्या टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत.आपल्या मुलाचे स्ट्रॉँग पॉर्इंट्स आणि विक पॉर्इंट्स अगोदर शोधा आणि मग त्याप्रमाणे आपली कृती करा. मुलांची बलस्थानं एकदा लक्षात आली की त्याचाच वापर करून मग त्यांच्या कमजोरींवरही मात करता येऊ शकते.आपलं मूल कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे त्याची तो व्हिज्युअल लर्नर आहे कि आॅडिटरी लर्नर आहे.. त्याला पाहून जास्त कळतं, ऐकून कि लिहून?.. हे एकदा कळलं की खूप गोष्टी सोप्या होतात.एक गोष्ट मात्र एकदम नक्की, तुमचं मूल कोणत्याही प्रकारचं असो, ते अगदी बुद्धिवान असो वा गतिमंद, पालक म्हणून तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो, मुलांना समजून घ्यावं लागतं आणि आपलं मूल जसं आहे तसं त्याला स्वीकारण्याची हिंमतही ठेवावी लागते. या गोष्टी सांगायला सोप्या, पण अनुकरण करायला निश्चितच अवघड आहेत, पण त्यासाठीचे प्रयत्न पालकांना करायलाच हवेत.अनेकदा आपण मुलांवर ओरडतो, एकच गोष्ट किती वेळा तुला सांगायची? कळत नाही का?.. खरं तर चांगल्या गोष्टी मुलांवर बिंबवायच्या असतील आणि त्या त्यांच्या अंगवळणी पाडायच्या असतील, तर मुलांना वारंवार आणि प्रेमानं, त्यांना समजून घेवून सांगणं गरजेचंच आहे. या गोष्टी कल्या तर मूल आणि पालक यांच्यातील नातेसंबंधांचा गोडवा कायम बहरत राहील.
मुलांची बलस्थानं तुम्हाला माहीत आहेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:57 PM
नंतर डोक्याला कटकट होण्यापेक्षा आत्ताच घ्या समजून..
ठळक मुद्देआपल्या मुलाची बलस्थानं आणि कमजोरी माहीत करून घ्या. मुलांची बलस्थानं एकदा लक्षात आली की त्याचाच वापर करून त्यांच्या कमजोरींवरही मात करता येऊ शकते.आपलं मूल व्हिज्युअल लर्नर आहे कि आॅडिटरी लर्नर आहे.. त्याला पाहून जास्त कळतं, ऐकून कि लिहून?.. हे एकदा कळलं की खूप गोष्टी सोप्या होतात.मूल कोणत्याही प्रकारचं असो, पालक म्हणून तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो आणि मूल जसं आहे तसं त्याला स्वीकारण्याची हिंमतही ठेवावी लागते.