जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही कसे वागता, कसे बोलता आणि काय खाता याचा प्रभाव दुसऱ्यांवर पडत नाही. पण जेव्हा तुम्ही कुणासोबत असता तेव्हा तुमच्या सवयींमुळे दुसऱ्यांना त्रास होतो. चला जाणून घेऊया मुलींच्या अशा काही सवयी ज्या मुलांना अजिबात आवडत नाहीत.
1) करिअरबाबत गंभीर नसलेल्या मुली - ज्या मुली आपलं टारगेट सतत बदलतात त्या मुली मुलांना आवडत नाहीत. जीवनात वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे, पण तुम्हाला जीवनात नेमकं काय करायचंय हेच क्लिअर नसेल तर अनेक अडचणी येतात.
2) जास्तीचा खर्च करणाऱ्या मुली - ज्या मुलींना अनावश्यक गोष्टींवर खर्च करायला आवडतं, ज्या मुली केवळ शो-ऑफ करण्यासाठी महागड्या वस्तूंची खरेदी करतात अशा मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत. बरं हे सगळं त्या पार्टनरच्या पैशांनी करत असतील तर याने अनेक अडचणी निर्माण होतात. महागड्या वस्तू खरेदी करणं चुकीचं नाहीये पण आधी त्या खरेदी करता येतील या योग्य बननं गरजेचं आहे.
3) चिडखोर आणि भांडखोर मुली - ज्या मुली सतत वेगवेगळ्या कारणांनी दु:खी राहतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर सतत चिडतात, कशाचाही विचार न करता काहीही बोलतात अशा मुलींपासून मुलं दोन हात दूरच राहतात. एखाद मुलाने त्यांना पसंत केलं तरी काही दिवसांनी तिच्या या स्वभावामुळे तो दूर जातो.
4) दुसऱ्यांशी तुलना करणाऱ्या मुली - ज्या मुली आपल्या बॉयफ्रेन्डसमोर दुसऱ्या मुलांचं सतत कौतुक करतात. अशा मुली मुलांना आवडत नाही. अशाप्रकारे कुणाशी तुलना करणे तुमच्या नात्यासाठी घातक ठरु शकतं.
5) प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणाऱ्या मुली - स्वातंत्र आणि सन्मानाची प्रत्येकालाच गरज असते. पण ज्या मुली मुलांच्या पर्सनल आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त लुडबूड करतात अशा मुली मुलांना आवडत नाहीत. अशा मुलींपासून मुलं दूर पळतात.
6) सतत फोनमध्ये व्यस्त राहणाऱ्या मुली - हे जरा विचित्र आहे पण खरं आहे. सेल्फी घेणं, सोशल मीडियावर पोस्ट, चॅटींग हे सगळं एका सीमेपर्यंत ठिक आहे. पण आपल्या पार्टनरकडे लक्ष न देता सतत फोनमध्ये बिझी असणाऱ्या मुली मुलांना आवडत नाहीत.
(टिप : या गोष्टी केवळ मुलींसाठीच नाहीतर मुलांनाही लागू पडतात.)