मैत्रीचे नाते साजरे करण्यासाठी वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येक दिवस खास असतो, पण तरीही संपूर्ण जगभरात आॅगस्टच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ धूमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईतील तरुणाईही शुक्रवारपासूनच फ्रेंडशिप डेसाठी उत्साही दिसून आली. रविवारी शाळा, कॉलेजना सुटी असल्याने त्यांनी काल एकमेकांच्या हातावर फ्रेंडशिप बॅण्ड बांधून किंवा मार्कर पेनने स्वत:चे नाव लिहून मैत्रीचे नाते खुलविले. ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याचा ट्रेंड हा पाश्चिमात्य देशाकडून आला आहे. फ्रेंडशिप डेची खरी सुरुवात पहिल्या महायुद्धानंतर झाली. पहिल्या महायुद्धानंतर आपापसांतील द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना संपविण्यासाठी १९३५मध्ये अमेरिकन सरकारने ‘फ्रेंडशिप डे’ला सुरुवात केली. फ्रेंडशिप डेनिमित्त ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा...हरवलेली मैत्री सापडलीसोशल मीडिया हे सध्या प्रभावी माध्यम ठरत असून, दुरावलेली नाती या माध्यमातून पुन्हा जुळू लागली आहेत. सॉफ्टवेअर तज्ज्ञ प्रसाद शिरगावकर यांनी याबाबत सांगितले, सोशल मीडियावर कॉमन ग्रुप, शाळेचे ग्रुप, गाव/शहरातील ग्रुप तयार झाल्याने, आता जुन्या मित्र-मैत्रिणींच्या कायम संपर्कात राहणे सोपे झाले आहे, तसेच अनोळखी, पण समविचारी लोकही या माध्यमातून एकत्र येऊ लागले आहेत. त्यामुळे ‘व्हर्च्युअल (आभासी) मैत्री’ हा नवा प्रकार उदयाला आला आहे.विलास चव्हाण यांनी सांगितले, बसवराज सनदी हा माझा मित्र नोकरीसाठी स्थलांतरित झाला. मात्र, सोशल मीडियामुळे २० वर्षांनंतर आम्ही संपर्कात आलो आहोत. सोशल मीडिया खूप चांगला आहे. दूर गेलेल्या आप्तेष्टांना आपण सोशल मीडियावर शोधून काढून शकतो.माध्यम जाणकार तुषार भामरे यांनी सांगितले, एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक कामासाठीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत असतो. फेसबुकवर किंवा इतर माध्यमांवर ज्या व्यक्ती दिसतात, त्या खऱ्या आयुष्यात बहुतांश नसतात, तसेच त्यांचे ते वेगळे जग असते, येथे ते फक्त रिलॅक्स होण्यासाठी येतात.।मॉल्स, हॉटेल्समध्ये आॅफरबाजारात फ्रेंडशिप बँड, विविध रंगाचे मार्कर पेन, मैत्रीपूर्ण संदेश लिहिलेली शुभेच्छापत्रे उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही तरुणाई ‘फ्रेंडशिप डे’ची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र होते. यंदाचा फ्रेंडशिप डे आठवणीत राहावा, यासाठी काही मित्रांनी पार्टीचे बेत आखले आहेत. त्यामुळेच काही हॉटेल आणि मॉल्समध्ये फ्रेंडशिप डेनिमित्त विशेष आॅफर्स ठेवण्यात आल्या आहेत. काही ग्रुपने या दिवशी बाहेर फिरण्याचे प्लॅन केले आहेत. सोशल मीडियावरून ‘#फ्रेंडस् फॉरेव्हर, #फ्रेंड ग्रुप, #फ्रेंडशिप डे’ असे हॅशटॅग वापरून मेसेज व्हायरल होत आहेत, तसेच मित्रांच्या जुन्या आणि नवीन फोटोचे कोलाज करून अपलोड केले जात आहेत.‘फ्रेंडशिप डे’चा नवा संकल्प#४ल्ला१्रील्ल८िङ्म४१४ल्ल‘ल्लङ्म६ा१्रील्ल िहा हॅशटॅग वापरत काही तरुणांच्या ग्रुपने आपल्या मित्र-मैत्रिणींना चॅलेंज दिले आहे. यात आपल्या सोशल मीडियाच्या विविध प्रोफाइलमधील किमान५ अनोळखी मित्रांना अनफे्रंड करायचे आहे. त्यामुळे या वर्षीच्या फ्रेंडशिप डेला आभासी विश्वातल्या मैत्रीला किंवा फसवेपणाला आळा बसेल, असे तरुणाईचे मत आहे. यंदाच्या फ्रेंडशिप डेला काही तरुणाईने हा नवा संकल्प केला आहे.>दिवस वेगळा, पण मैत्री कायमजगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये आॅगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, तर काही देशांत हा डे २ आॅगस्टला साजरा करतात. ओहायोच्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत ३० जुलैला ‘इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.>हॅशटॅग्जचासर्वाधिक वापर‘फ्रेंडशिप डे’चे सेलिब्रेशन सुरू झाले असून, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सवर त्याचे ट्रेंड्स अधिराज्य करीत आहेत. आपल्या पोस्टना सर्वाधिक लाइक्स आणि शेअर मिळावेत, यासाठी सोशल मीडियावर युजर्स ‘हॅशटॅग’चा वापर करतात. सध्या वैयक्तिक शुभेच्छा देण्याचा ट्रेंड कमी झाला असून, त्या जागी सामूहिक व सामाजिक शुभेच्छा देण्याकडे तरुणाईचा कल दिसून येतो.>व्हिडीओ शेअरिंगआतापर्यंतच्या फ्रेंडशिपमध्ये व्हिडीओ शेअरिंग जास्त होत असल्याचे दिसून येते. यामध्ये बॉलीवूडमधील मैत्रीशी संबंधित फिल्ममधील सीन आणि हॉलीवूडमधील फिल्मच्या सीन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्हिडीओ किंवा फोटो एडिटिंग अॅपचा वापर करून, सिनेमातील दृश्यात मराठी संवाद घालून ते शेअर करण्याचा कल जास्त फोफावत आहे. सामाजिक संदेश, मजा-मस्ती, आठवणी अशा विविध स्वरूपात यंदाच्या फ्रेंडशिप डेचा ट्रेंड असणार आहे.>आठवडाभरात२० लाखांहूनअधिक पोस्टजगभरात ‘फ्रेंडशिप वीक’ साजरा केला जातो. हाच ट्रेंड आता भारतातही मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून, गेल्या आठवड्याभरात तब्बल २० लाखांहून अधिक फे्रंडशिप डेच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या दिसून येत आहेत, तसेच यासंदर्भातले अनेक ट्रेंड्सही सोशल मीडियावर ठळकपणे पाहायला मिळतात.
Friendship Day 2018: ही दोस्ती तुटायची नाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 1:53 AM