बारामती : यंदा मैत्री दिनानिमित्त फ्रिज मॅग्नेटची चांगलीच क्रे झ आहे. त्यामध्ये स्माईली ट्रेंड्स अधिक लोकप्रिय आहे. तसेच काचेचे टेडी, लव्ह बर्डला अधिक पसंती आहे, असे ‘मॅजेस्टिक’चे राजेंद्र आहेरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जन्माला आल्यानंतर रक्ताची नाती ठरतात, ती आपल्या हाती नसतातच मुळी. मात्र, हृदयापासून, मनातील संवेदनांमधून निर्माण होणारे नाते म्हणजे मैत्री. अशी मैत्रीची व्याख्या केली जाते. रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक मैत्रीचे गुंफलेले नाते अधिक दृढ, घट्ट मानले जाते. मानवी जीवनातील या महत्त्वपूर्ण नात्याची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. आज साजरा होणाऱ्या मैत्रीदिनासाठी बारामती शहरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र होते.मैत्रीचे बंध गुंफताना आवश्यक भेटवस्तू, ग्रीटिंग खरेदीसाठी तरुणाईची झुंबड उडत आहे. यामध्ये फे्रंडशिप बँडसह विविध वस्तूखरेदीला तरुणाई पसंती देत आहे. गतवर्षी भारत आणि चीन यांच्यात डोकलाम प्रश्नावरून संघर्ष निर्माण झाल्यावरून चिनी वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. यंदाच्या वर्षीदेखील हेच चित्र कायम आहे. पाऊस लांबल्याने बाजारात मंदीसदृश वातावरण आहे. मात्र, मैत्रीदिन साजरा करण्यासाठी तरुणाईची सर्वत्र गर्दी होताना दिसत आहे.त्यामुळे रविवारी साजरा होणाºया दिवशी विशेषत: महाविद्यालयीनयुवक मित्रांबरोबर धमाल करणार आहेत. यावर्षीच्या मैत्रीदिनासाठी चॉकलेट, फुले, रंगीत बँडसह मॅग्नेटिक ग्लास, की चेन, पेन स्टँड, ब्रेसलेट, स्माईली, पेपरबॅग, टेडी, लिटिल बुक आॅफ फे्रंडशिप कोटेशन, कॉफी मग, वॉटर ग्लोब, वुडन फे्रम, कॅलेंडर, स्माईल मग, चॉकलेट बुके, टेडीवेअर, सॉफ्टटॉईज, वेगवेगळे थंब रिंग्ज, लकी बॉटल्स, लखोटे, ग्रीटिंग्ज, घड्याळे, फें्रडशिप पेंडंट, म्युझिकल फ्लॉवर्स, प्लॅस्टिक गुलाब, परफ्युम्स आदी वस्तूंची रेलचेल आहे.प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात पेपर प्रॉडक्टला अधिक मागणी आहे. यामध्ये पेपरबॅग, पेपरकोन, पेपरलॅम्प, पेपर फोटोफे्रमसारख्या पेपर प्रॉडक्टची बाजारात रेलचेल आहे. या वस्तूंना मागणीदेखील अधिक आहे. चीनसह, थायलंड, कोरिया येथील उत्पादनांना चांगली मागणी आहे.>....मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तूआपलं करिअर... आनंदाची ठिकाणे... छंद... आवडीनिवडी... सारंच... पण या साºयात कधीही बदलणार नाही ती आपली मैत्री. कारण मैत्रीच्या मुळाशी आहे तो आपल्या नात्यातला विश्वास... जगण्याचा हा प्रवास अखंड चालत राहावा... आपल्या मैत्रीच्या सहवासात... आजच्या जगात खरी मैत्री दुर्मिळ आहे, असं जग म्हणतं... त्या जगाने आपलं नातं थोडंच अनुभवलंय.मोहरून जावे... हे क्षण मैत्रीचे... फुलपंखी रंगात फुलावे... हे क्षण मैत्रीचे... मैत्री म्हणजे तू आणि मी... मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब... मैत्री म्हणजे दोन जीवनातला सेतू... मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू. अशा विविध संदेशांनी तरुणाईच्या मनावर गारुड घातले आहे. डिजिटल, सोशल मीडियाच्या प्रभावात मैत्रीचा संदेश देणाºया ग्रीटिंग्जचा मात्र आपला प्रभाव कायम आहे.
Friendship Day 2018: मैत्रीचे बंध गुंफण्यासाठी तरुणाईची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 1:15 AM