नेहमीच असं बोललं जातं की, मुलींचं आणि त्यांच्या वडिलांचं फार जवळचं किंवा वेगळं नातं असतं. पण तसं पाहिलं तर मुलींची पहिली मैत्रिणी ही त्यांची आई असते. मुली जवळपास त्यांच्या सर्वच गोष्टी म्हणजे अडचणी, त्रास, आनंद हे आईसोबत शेअर करतात. अशात एका रिसर्चमधून मुलींबाबत आणखी वेगळा खुलासा करण्यात आला आहे. म्हणजे खरंतर जे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत त्याची वेळ निघूनही गेली असेल किंवा तुम्ही ही गोष्ट करणं नुकतंच सुरू केली असेल.
वय जसजसं वाढत जातं किंवा बदलत जातं व्यक्ती तसतसा वेगळं वागू लागतो. त्याच्या वागण्यात अनेक बदल जाणवू लागतात. याकडे फारसं कुणी लक्षही देत नाहीत. हे वागणं कसं असतं याचाही विचार कुणी करत नाहीत. पण एका रिसर्चमधून एक अनोखा खुलासा करण्यात आला आहे.
scarymommy.com ने दिलेल्या वृत्तामध्ये एका रिसर्चनुसार, मुली ३३ व्या वर्षात त्यांच्या आईसारखा व्यवहार करू लागतात. म्हणजे त्या त्यांच्या आईसारखं वागू लागतात. या रिसर्चमध्ये असही सांगण्यात आलं आहे की, मुली मुलांच्या तुलनेत केवळ लवकर परिपक्वच होत नाहीत तर त्या त्यांच्या आईसारखा व्यवहारही करू लागतात. तर या रिसर्चनुसार, मुलं ३४ व्या वर्षात त्यांच्या वडिलांसारखा व्यवहार करू लागतात.
यूकेतील डॉ. ज्यूलियन डी सिल्वा यांनी २००० महिला आणि पुरूषांवर सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये सहभागी लोकांना त्यांच्या आई-वडिलांच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आलेत. या सर्व्हेत सहभागी महिलांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक महिलांनी हे मान्य केलं की, ३३ व्या वयात त्या त्यांच्या आईसारख्या व्यवहार करू लागतात. त्यासोबतच त्या त्यांच्या आईचं म्हणणं ऐकू लागतात. त्यांचं त्यांच्या आईला विरोध करण्यासारखं वागणं बंद झालेलं असतं.
तसेच सर्व्हेमध्ये सहभागी पुरूषांनी हे मान्य केलं की, ते ३४व्या वयात त्यांच्या वडिलांसारखे व्यवहार करू लागतात. त्यांच्या जास्तीत जास्त सवयी या वडिलांसारख्या होऊ लागतात. त्यासोबतच वडील आणि मुलगा यांचे विचारही मिळते जुळते होऊ लागतात.
हा सर्व्हे करणारे डॉ. ज्यूलियन डी सिल्वा यांचं मत आहे की, आयुष्याच्या एका वळणावर येऊ सर्वच मुलं-मुली त्यांच्या पालकांसारखे होऊ लागतात. सर्व्हेमध्ये सहभागी महिला आणि पुरूषांनी हे मान्य केलं की, जेव्हा आपण आपल्या पालकांच्या वयात पोहोचतो, तेव्हा आपण त्यांच्यासारखे वागू लागतो, त्यांच्यासारख्या गोष्टी जाणवू लागतात.