मुलींची सुरूवातीच्या काळात मुलांसोबत जेव्हा ओळख होते. तेव्हा मुलं खूप इंटरेस्टींग वाटत असतात. पण कालांतराने त्यांना बोअर व्हायला सुरूवात होते. तसंच काही न बोलता गप्प बसणे. रिस्पॉन्स न देणे असे प्रकार सुरू होतात मग मुलांची गणती बोरींग या कॅटेगरीत करतात. तुमच्या सोबत सुद्धा जर असं घडत असेल तर पार्टनरचा किंवा एखाद्या मुलीचा कंटाळलेपणा घालवण्यासाठी काही खास टिप्स आज तुम्हाला सांगणार आहोत.
(image credit- bustle)
मुलींशी बोलण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला विषय शोधण्याची गरज नाही. कोणत्याही विषयावर मुलींशी बोलू शकता. मुलींना आवडत असलेल्या आणि ट्रेंडींग असलेल्या विषयावर बोलणं जास्त फायद्याच ठरेल. वेबसिरीज, बॉलिवुड, ब्युटी यापैकी कोणत्याही विषयावर तुम्ही संवाद साधू शकता.
तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत असता त्या व्यक्तीची आवड आणि पॅशन जपण्यात त्या व्यक्तीची मदत करा. त्या व्यक्तीला डान्सची किंवा पेन्टींगची आवड असेल तर त्याबद्दल संवाद साधा. त्या व्यक्तीला करीअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करा. जर तुम्ही त्या मुलीशी तिला आवडत असलेल्या विषयावर चर्चा केली किंवा सर्पोट केला तर तुमच्या अधिक चांगल्याप्रकारे ती मुलगी बोलण्यासाठी कंफर्टेबल असेल.
स्वप्न सगळ्यांचीच असतात. जर तुम्हाला त्या मुलीशी बोलण्यात किंवा चांगला पार्टनर बनण्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वप्नांबाबत विचारपूस करा. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेलेले मार्ग तुम्ही त्या मुलीला दाखवू शकता.
त्या मुलीच्या लहानपणीच्या आठवणींबद्दल विचारा आणि तीचं मन रमवण्याचा प्रयत्न करा. तिचं लहानपण कुठे गेले. ती कोणत्या वातावरणाच वाढली, शालेय जीवनात केलेली मस्ती.. त्यांच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच जर भूतकाळातील वाईट घटना किंवा प्रसंगापासून ती मुलगी दुखावली असेल तर त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी तीची मदत करा.
त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास त्या मुलींच्या मनात अधिक घट्ट होईल. सध्याच्या काळात मुली या करिअरवर अधिक लक्ष देत असल्यामुळे त्यांच्या करीअरच्या आड येईल असं वागू नका. तसंच मुलींना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करा.