महिलांच्या मनात नेमकं काय असतं जे जाणून घेणं तसं कठिणच. त्यांच्या मनात कोणत्या वेळी काय चालू असतं, याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. मात्र, नुकत्याच एका शोधातून करण्यात आलेला खुलासा काही तरुणांना आनंद देणारा ठरु शकतो. महिलांना कशाप्रकारचे पुरुष आवडतात, कशाप्रकारच्या पुरूषांकडे जास्त त्या आकर्षित होतात यावर हे संशोधन करण्यात आले.
या शोधानुसार, महिला त्या पुरूषांना जास्त आकर्षक समजतात, ज्या पुरुषांचं स्टोरीटेलिंग चांगलं असतं. म्हणजे जे पुरूष चांगल्या पद्धतीने स्टोरी सांगतात ते अधिक आकर्षक असतात, असे महिलांचे म्हणने आहे. चांगल्याप्रकारे स्टोरी सांगण्याचा फंडा महिलांमध्ये पुरूषांना अधिक लोकप्रिय बनवतो. अशा पुरूषांकडे महिला दिर्घकालिन साथीदाराच्या रूपात बघतात.
महिला आणि पुरूष यांच्यातील संबंध अधिक चांगले होण्यासाठी बराच वेळ बोलणं आणि वेगवेगळया गोष्टी सांगणं या महत्वाची भूमिका निभावतात. ज्याप्रकारे पुरूष त्यांची कथा रचतात आणि ऐकवतात ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर खोलवर प्रभाव करुन जातं.
ऑस्ट्रेलियन डॉट कॉम एयू ने इतिहासकार आणि साहित्य समीक्षक केरी विंटरचा हवाला देऊन लिहीले आहे की, ‘कथा या खोल अंतरंगासाठी असतात. त्या ऐकवणा-याला किंवा सांगणा-याला सशक्त बनवतात. सोबतच ऐकणारा श्रोताही सशक्त बनतो. कारण कथा ऐकवणारा कसा आहे, त्याची क्षमताही यावरून माहिती पडतं’.