मुलं आपला पार्टनर सिलेक्ट करताना विशेष काळजी घेतात. बऱ्याचदा ते आपल्या भावना कोणाला सांगत नाहीत. ते आपल्या पार्टनवर खुप प्रेम करतात पण तिच्याबाबत काही बोलायचे असल्यास ते टाळाटाळ करतात. काही निरिक्षणांतून असे समोर आले आहे की, मुलींमधील काही असे गुण जे मुलांना घायाळ करतात. परंतु ते कोणाला सांगत नाहीत.
प्रत्येक मुलीमध्ये काही अशा खास गोष्टी असतात. ज्यामुळे मुलं त्यांच्यावर फिदा होतात. काहींचे डोळे तर काहींचे ओठांची रचना, काहींचे केस तर काहींचे हसणे. एवढेच नाही बऱ्याचदा कवि किंवा शायर आपल्या ओळी या तरूणींच्या सौंदर्यावरच रचतात. पण प्रेम करण्यासाठी प्रत्येक वेळी कवि किंवा शायर असणे तसेच व्यक्त होणे गरजेचे नसते. काही मुलं अशीही असतात जी प्रेम करतात पण शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाहीत.
1. जर तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला असेल तर कोणीही तुमची कंपनी एन्जाय करेल. जास्त करून खराब मूड ठिक करण्याचे कसब तुमच्याकडे असेल तर मुलांना तुम्ही आवडू शकता.
2. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर गरजेचे नाही की, तुम्ही नेहमी त्या व्यक्तिसोबत असणे गरजेचे आहे. प्रेमाव्यतिरिक्त आपल्या जीवनात अनेक चढ-उतार येतात. अशावेळी बऱ्याचदा पार्टनरला पर्सनल स्पेसची गरज असते. जर तुम्ही आपल्या पार्टनरची ही गरज लक्षात घेतलीत. तर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी खास ठरू शकता.
3. तुमचा पार्टनर जर त्याच्या मित्रमंडळींसोबत अथवा त्याच्या कुटुंबासोबत आहे तर त्याची अशी इच्छा असते की, तुम्हीदेखील त्याच्या कुटुंबावर आणि मित्रमंडळींसोबत सलोखा जपण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यामुळे त्याचा तुमच्यावरचा विश्वास आणखी वाढेल.
4. नात्यामध्ये समजूदारपणा दाखवणे गरजेचे असते. कधी कधी दोघांमध्ये खटके उडतात. अशावेळी तुम्ही तुमचे नाते वाचवण्याचा प्रयत्न करता. अशावेळी जी तो तुमच्यावर नाराज असेल पण तो तुमच्या समजुतदारपणाचा आदर करेल.
5. ऐकणे हा तुमच्या स्वभावातील गुण असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरचे मन सहज जिंकू शकता. जर त्याला तुम्हाला काही सांगायचे असेल तर ते नीट लक्ष देऊन ऐकणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यामध्ये दुरावा येऊ शकतो.