शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Happy Valentine day 2021 : व्हेलेंटाईन डे साठी पार्टनरला काय गिफ्ट देऊ? असा विचार करत असाल तर 'हे' नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 09:47 IST

Valentine Day 2021gift ideas : पार्टनरचा बर्थडे सोडून तुम्ही इतरवेळी गिफ्ट देत नसाल तर तुमच्यासाठी मस्त संधी आहे. व्हॅलेनटाईन डे ला गिफ्ट देऊन पार्टनरला (Valentine's Day Celebration) खूश करू शकता.

(Image Credit- T0tally Fanky)

व्हॅलेनटाईन वीकचा शेवटचा दिवस व्हॅलेनटाईन डे. सगळे कपल्स अगदी उत्साहात हा दिवस साजरा करणार. जर तुम्हाला आपल्या पार्टनरला गिफ्ट द्यायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास गिफ्टचे प्रकार सांगणार आहोत. पार्टनरचा बर्थडे सोडून तुम्ही इतरवेळी गिफ्ट देत नसाल तर तुमच्यासाठी मस्त संधी आहे. व्हॅलेनटाईन डे ला गिफ्ट देऊन पार्टनरला (Valentine's Day Celebration) खूश करू शकता.

गिफ्ट देणं म्हणजे नेहमीच खर्च करायला हवा असं नाही. कमीतकमी पैश्यात गिफ्ट (Valentine Day gift ideas)  घेऊन सुद्धा तुम्ही पार्टनरला खूश करू शकता. अनेकदा तुम्ही पाहीलं असेल लाल रंगाचे वेगवेगळे कपडे किंवा कार्डस व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात असतात. तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर दैनंदिन वापरातील वस्तु सुद्धा तुम्ही पार्टनरला देऊ शकता. 

पिलो, बेल्ट, वॉलेट

पार्टनरला पिलो दिलात तर तुमची एक चांगली आठवण राहील.  मुलांना गिफ्ट करत असताना तुम्ही रोज लागणारं पाकीट आणि बेल्ट दिला तर खूपच उत्तम ठरेल. कारण या दोन वस्तु मुलं नेहमी वापरत असतात. शिवाय फारसा खर्च सुद्धा करावा लागणार नाही. तुमच्या पार्टनरच्या आवडत्या रंगाचे आणि पॅटर्नच्या वस्तु तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर मुलीला गिफ्ट द्यायचं असेल तर टेडी बिअर सुद्धा देऊ शकता. अनेक मुलींना डेडी बिअरची आवड असते. तुम्ही जर हे गिफ्ट दिलं तर ते नेहमी स्वतः सोबत ठेवतील.

घड्याळ

तुम्ही आपल्या पार्टनरला त्याच्या आवडत्या ब्रँडेड कंपनीचं घड्याळ देऊ शकता. विशेष म्हणजे त्याच्या आवडीच्या रंगाचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिल्यास त्याला आणखी आनंद होईल. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर घड्याळावर मोठा डिस्काऊंड देण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन स्वस्तात चांगलं घड्याळ तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं नसल तर तुम्ही बाजारातूनही कमीत कमी पैशात आकर्षक डिजाईनचे घड्याळ आणू शकता. 

मोबाईल

सध्या मोबाईल फोन्सवर सुट मिळत आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्डवर मोबाईल फोनवर मोठी सुट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कमी पैशात चांगला स्मार्टफोन खरेदी करून तो आपल्या पार्टनरला गिफ्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक व्हरिएंट उपलब्ध आहेत. फोटो काढण्याची आवड असेल तर अडवांस कॅमेराचा फोन घेऊ शकता. Happy Valentine's Day 2021 : पार्टनरसोबत संध्याकाळी व्हॅलेंटाईन डे  सेलिब्रेट करण्यासाठी ही आहेत परफेक्ट डेस्टिनेशन.....

शर्ट्स, जॅकेट

तुमच्या पार्टनरला नवनवीन कपडे घालण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला ब्रँडेड जॅकेट किंवा शर्ट्सचा सेट  गिफ्ट करू शकता. तुम्ही जर त्याच्या आवडत्या रंगाचा शर्ट किंवा कुर्ता घेतला तर  तर ते त्याला अधिक आवडेल आणि हे गिफ्ट त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे.... 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपValentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेGift Ideasगिफ्ट आयडियाRelationship Tipsरिलेशनशिप