असे मिळवून दिले त्याने सगळ्या वर्गाला पैकीच्या पैकी मार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2016 4:52 PM
विनीने सगळ्या वर्गाला आॅरगॅनिक केमिस्ट्री या विषयात फक्त कचरापेटीत एक कागद टाकून पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याचा पराक्रम करून दाखवला.
संपूर्ण वर्गात एक दोनच विद्यार्थी असे असतात ज्यांच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची क्षमता असते. पण काही बहाद्दर असे असतात जे एका फटक्यात संपूर्ण वर्गमित्रांना एखाद्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून देतात. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर त्यासाठी तुम्हाला विनी फोर्टे या विद्यार्थ्याची गोष्ट माहिती पाहिजे.विनीने सगळ्या वर्गाला आॅरगॅनिक केमिस्ट्री या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याचा पराक्रम करून दाखवला. आणि ते काही पेपर फोडून किंवा परीक्षेत सर्वांना उत्तर दाखवून नाही तर फक्त कचरापेटीत एक कागद टाकून. नाही कळाले? त्याचे झाले असे की, ओहायओ विद्यापीठातील केमिस्ट्री शिक्षकाने आपल्या क्लासला एक चॅलेंज दिले. त्यांनी सांगितले की, जर कोणी वर्गाच्या सर्वात मागे उभा राहून पहिल्याच प्रयत्नात कागदाचा तुकडा फेकून बरोबर कचरा पेटीत टाक ला तर मी संपूर्ण वर्गाला माझ्या विषयात पैकीच्या पैकी गुण देईल.आता शिक्षकाने दिलेले आव्हान घेतले विनीने. या पठ्याने वर्गाच्या बाल्कनीतून कचरापेटीवर असा काही निशाणा साधला की, कागदाचा बोळा जाऊन पडला थेट डस्टबीनमध्ये. कागद कचारपेटी पडल्यावर संपूर्ण वर्गाने केलेला एकच जल्लोष बघण्यासारखा होता. एका विद्यार्थिनी हा परफेक्ट शॉट कॅमेऱ्यात कैद केला आणि याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. लागलीच सोशल मीडियावर तो व्हायरलदेखील झाला. बिचाऱ्या शिक्षकाला मात्र नाईलाजाने संपूर्ण वर्गाला शंभर गुण द्यावे लागले. }}}}एका क्षणात विद्यापीठाचा हीरो बनलेल्या विनीच्या या व्हिडिओ ट्विटला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि रिट्विट्स मिळालेले आहेत.