(Image Credit :www.robertstravel.com)
लग्नाच्या तयारीसोबतच आता हनीमूनचीही तयारी आता युद्ध स्तरावर सुरु केली जाते. सध्य सगळीकडे लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे अर्थातच अनेक नवीन कपल्स त्यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग करण्याच्या तयारीला लागले आहेत. ही अशी ट्रिप असते ज्यासाठी उत्साह तर भरपूर असतो, पण काहींच्या मनात जरा भीतीही असते. तसेच अनेक प्रश्नाचं काहूर त्यांच्या मनात माजलेलं असतं. जर तुम्हालाही काही समस्या असतील किंवा तुमच्या जवळच्या कुणाला असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
उत्साहात निष्काळजीपणा करु नका - हनीमून प्लॅन करताना सर्वातआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही निष्काळ तर करत नाही आहात ना! तुमचे भलेही काही विचार असोत, पण जास्तीत जास्त लोकांना हा प्लॅन सीक्रेट ठेवायचा असतो. असे होऊ नये की, उत्साहाच्या भरात तुम्ही तुमचा प्लॅन दुसऱ्या कुणाला सांगितला. याने वेळेवर काहीही अडचण निर्माण होऊ शकते.
एकमेकांशी बोला - हनीमूनचा सरप्राइज प्लॅन एक चांगली रोमॅंटिक आयडिया होऊ शकते. पण हे विसरु नका की, ही तुम्हा दोघांची ट्रिप आहे. काही ठिकाणांची तुम्हाला जशी आवड असू शकते, तशीच आवड तुमच्या पार्टनरला वेगळ्या ठिकाणांची असू शकते. त्यामुळे यासंबंधी काहीह प्लॅन करण्याआधी एकमेकांसोबत बोला.
बजेटची काळजी - कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला बजेट आधीपासूनच तयार ठेवायला हवं. कारण या बजेट प्लॅनिंगवरच तुमच्या सर्व बुकिंगपासून ते शॉपिंगपर्यंतच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. बजेट आधीच प्लॅन केला तर तुमचं सर्व प्लॅनिंग योग्यप्रकारे होऊ शकतं. तुम्हाला वेळेवर कोणतीही अडचण येणार नाही.
रिव्ह्यू जाणून घ्या - कोणत्याही हनीमून स्वीटची बुकिंग करण्यापूर्वी त्या जागेचे रिव्ह्यू जाणून घेणे विसरु नका. कारण अनेकदा घाईगडबडीत बुकिंग केली जाते. पण नंतर तिथे त्यानुसार सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच हनीमून स्वीटमध्ये कॅमेरे लावण्यात आल्याच्या बातम्याही येत असतात. त्यामुळे कुठलही बुकिंग करताना हॉटेलची योग्य माहिती आधी घ्यावी. केवळ सुविधाच नाही तर हॉटेलचीही माहिती आधी घ्यावी.
डेट्सची प्लॅनिंग - लग्न झाल्या झाल्या थेट लग्न मंडपातून थेट हनीमूनला जाणे अजिबात गरजेचे नाहीये. तुम्ही शांतपणे या डेट्सचं प्लॅनिग करु शकता. यात मासिक पाळीच्या डेट्सचाही विचार करा. तसेच घरात होणाऱ्या वेगवेगळ्या समारोहांबाबतही विचार करा. याचा विचार करुनच हनीमूनचा प्लॅनिंग करा.