(Image Credit : Money Under 30)
वैवाहिक जीवनामध्ये होणाऱ्या भांडणांमागे गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणं, उगाच नको असलेल्या गोष्टी विकत घेणं यांसारखी कारणं असतात. अनेकदा ही कारणं एवढं गंभीर रूप घेतात की, यामुळे नातं तुटण्यापर्यंत गोष्टी पोहोचतात. त्यामुळे अशी भांडणं फार समजुतारपणाने हाताळणं आवश्यक असतं. कोणतंही नात असलं आणि त्यामध्ये पैशांचे व्यवहार आले की त्यामुळे अनेकदा नात्यामध्ये तणाव येतो. परंतु मॅरिड लाइफमध्ये अनेकदा सर्व गोष्टींचा समतोल राखणं गरजेचं असतं. त्यामुळे नातं टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी वेळीच लक्षात घेणं गरजेचं असतं.
एकमेकांवर आरोप लावू नका
आर्थिकदृष्ट्या कमजोर असणं आणि एकमेकांमधील संवाद कमी असल्यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. अनेक जोडपी एकमेकांशी पैशांबाबत काहीच बोलत नाहीत. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत व्यवहारांबाबत फारसं बोलत नसाल आणि तुमच्या लक्षात आलं की, तुमचा पार्टनर नको तिथे उगाचंच पैसे खर्च करत आहे तर, अशावेळी तुम्ही काय कराल? सर्वात आधी तुम्ही शांत राहणं आवश्यक आहे. एकमेकांना जबाबदार ठरवण्याऐवजी एकमेकांना समजून घ्या. तसेच पार्टनरसोबत शांतपणे बोलून त्याला त्याच्या चुकीच्या सवयीबाबत समजावून सांगा. दोघांनी एकत्र बोलून सेव्हिंग्स करण्यासाठी सुरू करा.
(Image Credit : Money Crashers)
एकत्र बजेट बनवा
उगाचच खर्च करण्यापासून बचाव करण्यासाठी एक गोष्ट आपल्याला नेहमीच फायदेशीर ठरते ती म्हणजे, बटेज तयार करणं आणि एक टार्गेट सेट करणं. आपल्या जोडीदारासोबत एकत्र बसून याबाबत प्लॅनिंग करा. यामुळे उगाचच पैसे खर्च करण्यावर आळा बसतो.
(Image Credit : yourstory.com)
जॉइंट अकाउंट
खरं तर नात्यामध्ये व्यवहारिक गोष्टींप्रमाणे चालणं अगदी तंतोतंत शक्य नसतं. पार्टनरच्या खर्चांवर फार मर्यादा घालणं समजुतदारपणा नाही. कारण यामुळे एकमेकांप्रति द्वेष निर्माण होऊ शकतो. तसेच यामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्याऐवजी जास्त खर्च होऊ शकतो. अशातच दोघांच्या नावाने एक जॉइंट अकाउंट ओपन करणं फायदेशीर ठरतं. या अकाउंटमध्ये घर खर्चासाठी पगाराच्या रक्कमेतील एक भाग ठेवणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त दोघांनीही आपलं एक पर्सनल अकाउंट ठेवावं आणि त्यामध्ये स्वखर्चासाठी पैसे ठेवावेत.
(Image Credit : Best Finance Network)
खर्च नियंत्रणात ठेवा
कदाचित हा सल्ला तुम्हाला थोडासा विचित्र वाटेल पण एक लिस्ट तयार करा आणि क्रेडिट कार्ड घरीच ठेवून शॉपिंगला गेल्याने पैसे वाचवण्यासाठी मदत मिळण्यास मदत होते. जर तुमचा खर्च नियंत्रणात नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला क्रेडिट कार्ड घरी ठेवण्यासाठी सांगू शकता. याव्यतिरिक्त पार्टनरला ऑनलाइन शॉपिंगही कमी करण्यासाठी सांगू शकता.
(Image Credit : Auctus Capital Partners)
आर्थिक सल्लागाराची मदत घ्या
पैसे वाचवण्यासाठी केलेले सर्व उपाय व्यर्थ ठरत असतील तर तुम्ही अशावेळी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. ते तुम्हाला आणखी काही उपाय सांगतील. ज्यांच्या मदतीने खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होइल.
टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोमताही उपाय करण्याआधी तुम्ही त्या विषयाशी निगडीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.