नातं कितीही घट्ट का असेना त्यात छोटे मोठे खटके उडतच असतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर समजदार असाल तर हे छोट्या वादांमधून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं. पण अनेकांना हे जमत नसल्याने अडचणी वाढतात. एका शोधानुसार, ७० टक्के नाती यासाठी बिघडतात कारण एका पार्टनरला असं वाटतं की, दुसऱ्या पार्टनरचा व्यवहार बदलला आहे. अशात नात्यात सतत भांडणे होऊ लागतात. पण यातून बाहेर येण्यासाठी आणि अतिसंवेदनशील पार्टनरला अशा स्थितीमध्ये कसं हाताळायचं याची काही उदाहरणे देता येतील.
का तुटतं नातं?
नात्यांमध्ये अडचणी येण्याची सुरुवात गैरसमजांमधून होते. विनाकारणच्या गोष्टींवरुन गैरसमज होतात आणि त्यातून भांडणं वाढतात. आणि एका काळानंतर या कारणांमुळे नात्यात राग आणि व्देष निर्माण होतो. या गैरसमजांमुळेच अनेकदा दोन्ही व्यक्ती एकमेकांप्रति सहानुभूती गमावून बसतात. त्यांना हे नातं ओझं वाटायला लागत असतं.
अनेक मुद्द्यांवर महिला आणि पुरुष स्वत:ला श्रेष्ठ समजतात. पण अशावेळी दोघांपैकी एकानेही समजदारपणा घेतला नाही तर समस्या अधिक वाढू शकते. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही सगळंकाही सहन करत जावं. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर प्रश्नांची उत्तरे द्या. नात्यामध्ये एकमेकांवर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. आपल्या पार्टनरला याची जाणिव करुन द्या.
काय बदलतो व्यवहार?
कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींना आपल्या नात्याप्रति काही जबाबदाऱ्या आणि काही मागण्या असतात. असे शक्य नाहीये की, ज्याप्रकारे तुम्ही आधी मित्र होतात तसंच वागणं नातं प्रेमात बदलल्यावर असेल. मैत्रीतून प्रेमाच्या नात्यात अडकलेले व्यक्ती सुरुवातीला तर गमती-जमती करतात, पण प्रेमात नंतर काही गोष्टी बदलतात. आधीसारखं तुम्हाला वागता येत नाही. पण ही बदलेली परिस्थिती त्याच्यात झालेल्या बदलाला कारणीभूत असते.
प्रत्येक नात्याची गरज वेगळी
प्रत्येक नात्याच्या गरजा वेगळ्या असतात. कुठे तुम्हाला मोठेपणाची भूमिका घ्यावी लागते तर कुठे तुम्हाला लहान बनून ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या नात्याच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार वागणे दोघांचीही जबाबदारी असते. असे केल्याने दोघांनाही नातं टिकवण्यास मदत होते. कधी कधी पार्टनरच्या बदलत्या व्यवहाराला सहन करणे कठीण होऊन बसतं. त्यामुळे नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. पण अशातच तुम्हाला संयमाने आणि डोकं शांत ठेवून विचार करायचा असतो.
कसे कराल पार्टनरसोबत डील
कोणतही नातं वाचवण्यासाठी ते नातं भावनात्मक रुपाने स्विकारणं गरजेचं असतं. अनेकजण सुरुवातीच्या काही काळात आपल्या पार्टनरसोबत याबाबत बोलण्यास टाळाटाळ करतात. पण याच कारणाने दोघांमधील दरी आणखी वाढते. संवाद हा कोणत्याही नात्यातील महत्वाचा भाग आहे. तो नीट नसेल तर नातं अडचणीत येतं. याने तुमच्या पार्टनरच्या वागण्यात फरक पडलेला असू शकतो. अशावेळी तुम्ही हे समजून घेणं गरजेचं असतं तुम्ही मोकळेपणाने व्यक्त व्हा. पार्टनरच्या आतापर्यत न समजलेल्या भावना समजून घ्या. त्याच्याशी बोला आणि अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचं नातं केवळ तुम्हीच वाचवू शकता इतर कुणीच नाही.
भूतकाळातील संबंधांना समजून घेण्यास ज्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील त्याच तुमच्या पार्टनरकडून झाल्या असतील. ही वेळ त्यातून शिकण्याची आणि नात्यात विश्वास निर्माण करण्याची आहे. सकारात्मक विचार आणि योग्य संवाद नातं आणखी मजबूत करण्यास नक्कीच मदत करतं.