(image credit-eedle.com)
एखादी गोष्ट जर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला स्मरणशक्ती कमजोर असण्याची समस्या असु शकते. अनेकदा तुम्ही कामासाठी एखाद्या व्यक्तीला फोन करता. नंतर विसरून जाता की आपल्याला काय बोलायचं आहे. जे आपल्याला बोलायचं आहे. ते राहून जातं आणि आपणं वेगळंच बोलत राहतो. जर तुमची स्मरणशक्ती नकळतपणे कमजोर होत जात असेल. तर आज आम्ही तुम्हाला स्मरणशक्ती उत्तम ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. नेहमी आपण असं म्हणत असतो की बदाम खाल्याने स्मरणशक्ती व्यवस्थित राहते. पण त्यासोबतच काही उपायांचा वापर तुम्ही दैैनंदिन जीवनात केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहील.
काही आर्टवर्क करा
स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे. कारण जर तुम्ही एखादं चित्र काढण्यात किंवा तुम्हाला आवडत असलेल्या कामात मन जर रमवण्याचा प्रयत्न केला. तर तुमची स्मरणशक्ती चांगली राहील.( हे पण वाचा-'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा, तुमचं नातं आता तुटायचंच बाकी राहिलय)
नियमीत व्यायाम करा
तज्ञांच्यामते जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर तुमची स्मरणशक्ती कमजोर होत नाही. त्यामुळे रोज व्यायाम नियमीतपणे करा. त्यामुळे तुमची नर्व सिस्टमचे कार्य सुरळीत राहते. तसंच तुमचं मानसीक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम उपयुक्त ठरेल.
कामात ब्रेक घ्या
(image credit- exclusive multicredit.com)
जर तुम्हाला तुमची मेमरी चांगली हवी असेल तर कामाच्यामध्ये ब्रेक घ्या. समजा जर तुम्ही तासनतास एकाच जागी बसून काम किंवा अभ्यास करत असाल तर १ ते २ तासांच्यामध्ये ब्रेक घ्या. तसंच आपली स्मरणशक्ती आणि डोकं व्यवस्थित ठेवण्यासाठी कामातून वेळ काढून कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन या, त्यामुळे बदल झाल्याने कामासाठी परत आल्यावर तुम्ही अधिक उत्साहाने काम कराल.
पुरेशी झोप घ्या
आपली स्मरणशक्ती कमजोर होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे अपुरी झोप घेणे. खाण्यापिण्याच्या झोपेच्या वेळा निश्चिच नसणे यामुळे मानसीक आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्मरणशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. (हे पण वाचा- या पद्धतीने जाॅगिंग केलंत तर एकही दिवस तुम्ही करणार नाही कंटाळा)