आज हग डे साजरा करत असताना कोणत्याही मुलीला मिठी मारायची म्हणजे खूपच घाबरायला होत असतं. कधी कधी तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतं. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घाबरायला होणार नाही.
योग्य वेळेची वाट पाहून मगच हग करा. म्हणजेच तुम्हाला वाटलं तेव्हा मिठी मारली असं करू नका. भेटल्यानंतर किंवा काही रोमॅंन्टिक बोलत असताना किंवा बाय बोलत असताना मगच हग करा. पार्टनरच्या डोळ्यात पाहून तिला मिठी मारण्यात किती रस आहे हे आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मुलीच्या हावभावांवर लक्ष असू द्या. जर आवाज नॉमर्ल असेल आणि खूपच शांत किंवा काहीही रिएक्शन न देता तुमची पार्टनर बसली असेल तर ती मिठी मारण्यास फारशी इच्छुक नाही असा अर्थ असू शकतो.
घाई न करता आरामाने मुलीच्या जवळ येऊन तीला मिठी मारा. उताविळपणा करू नका. मुलीच्या हावभावांवरून किती वेळ हग करायचं आहे हे ठरवा. जर ती फारशी उत्सुक नसेल तर काही सेकंद हळूवारपणे मिठी मारून लगेच दूर व्हा.
पार्टनरला जर तुम्ही पहिल्यांदा मिठी मारली असेल तर त्यानंतर फिडबॅक द्यायला विसरू नका. तुम्हाला हग करून कसं वाटलं हे पार्टनरला नक्की सांगा. कदाचित तुमची प्रतिक्रिया ऐकून पार्टनरला फार उत्साह येईल.
मिठी मारण्याचे वेगवेगळे प्रकार आधी समजून घ्या . जर तुम्ही घरी असाल आणि तुमची पार्टनर किचनमध्ये काम करत असेल तर तुम्ही मागून येऊन आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी हग करू शकता. एका हाताने जवळ घेऊन सुद्धा तुम्ही हग करू शकता.( हे पण वाचा-म्हणून लग्न करताना पार्टनर वयाने मोठा असावा...)
मिठी मारण्याआधी स्वतःची स्वच्छता ठेवा. जर तुमच्या शरीरातून घामाचा दुर्गंध येत असेल तर पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो. मिठी मारत असताना तुमचे हात कुठे आहेत याकडे लक्ष देणं सुद्धा तिततकंच महत्वाचं आहे.
जर तुमच्या पार्टनरला मिठी मारायला आवडत नसेल तर उगाच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. पार्टनर स्वतःहून तयार होण्याची वाट पहा. ( हे पण वाचा-Hug Day : पार्टनरला हग करत असताना 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात)