अनेकदा कपल्सना आपण एकमेकांचे हात धरुन चालताना बघतो. ही एक सामान्य बाब आहे. कुणीही हात धरताना त्याने काय फायदा होतो, याचा विचार करत बसत नाहीत. पण एका शोधातून गर्दीमध्ये हात एकमेकांचे हात धरण्याचे किंवा हात धरुन चालण्याचे फायदे सांगितले आहेत. शोधानुसार, कपल्स जेव्हा एकमेकांचे हात धरतात तेव्हा एकमेकांचा त्रास कमी करतात.
(Image Credit : www.idiva.com)
खरंतर एकमेकांचे हात पकडने आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक चांगला पर्याय आहे. जेव्हाही तुमचा जोडीदार समस्येत असतो किंवा टेन्शनमध्ये असतो, तेव्हा त्याचा हात पकडला तर त्याला रिलॅक्स वाटेल. पण काय एकमेकांचा हात पकडून चालणे हे कोणत्या गोष्टीकडे इशारा करतं हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ....
रिसर्च काय सांगतो?
रिसर्चनुसार, हात पकडून चालणे एकमेकांवर अतूट विश्वास असल्याची जाणीव करुन देणारं असतं. गर्दीच्या ठिकाणी एकमेकांचा हात पकडून चालणे हे दर्शवतं की, तुम्ही सोबत आणि सुरक्षित आहात. म्हणजे एकमेकांचा हात पकडून चालण्याने नातं आणखी मजबूत होतं. एकमेकांची जवळीकता वाढते.
सुरक्षित असल्याची भावना
जेव्हाही पब्लिक प्लेसवर महिला त्यांच्या पार्टनरचा हात पकडून चालतात, तेव्हा त्यांना फार सुरक्षित असल्याचं जाणवतं. त्यासोबतच पार्टनरचा हात पकडून चालल्याने महिलांना कोणत्याही भीतीशी लढण्याची हिंमत मिळते.
(Image Credit : india-forums.com)
शारीरिक वेदनेतून आराम
रिसर्चनुसार, जर पती प्रसुतीदरम्यान त्याच्या पत्नीचा हात पकडतो तेव्हा पत्नीला फारच दिलासा मिळतो. इतक्या वेदना होताना तिचा पती तिच्यासोबत आहे याने तिला धीर मिळतो. असेही सांगितले जाते की, एकमेकांचा हात पकडल्याने दोघांचे श्वास, हृदयाचे ठोके आणि मेंदूतील वेव्ह एक होतात.