आजचा समाज कितीही उच्च आणि सुधारलेल्या विचारसरणीचा असला तरी काही बाबतीत मात्र अजूनही जुन्या विचारांनी चालणार लोक दिसून येतात. भारतात अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाहांना परवानगी दिली जात नाही. अशावेळी तरूण मुला मुलींना घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या आवडत्या व्यक्तीसह राहावं लागतं. तर काही कुटुंबातील लोक असेही असतात त्यांना आपल्या मुलांच्या आनंदाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट मोठी वाटत नाही. अशाच एका घटनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हिंदू कुटुंबात जन्मलेला सत्यजीत संजय यादव आणि मुस्लिम कुटुंबात जन्मलेली मारशा मुजावर यांचे लहानपणापासून एमेकांवर प्रेम होते. सत्यजीत हा सिव्हील इंजिनिअर आहे. सुरूवातीला आपल्या घरातले स्वीकारतील का? लग्नाला परवागनी देतील का? अशी भीती दोघांच्याही मनात होती. अखेर मारशा आणि सत्यजित यांचा विवाह साध्या पद्धतीनं साजरा असं दोन्ही कुटुंबांनी ठरवलं होतं. त्यानंतर १९ मार्चला मौलानांच्या उपस्थितीत आधी मुस्लिम पद्धतीनं विवाह लावण्यात आला. त्यानंतर हिंदू पद्धतीनं लग्न लावण्यात आलं. टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....
माणुसकी हाच खरा धर्म
मारशाचे वडील नदीम मुजावर व्यायसायिक आहेत आणि पणजोब सुलेमान शेट यांनी संस्थानकाळात गामा-गुंगा याच्या कुस्तीचे आयोजन केले होते. मुलीचे वडील नदीम यांनी माध्यमांशी बोलताना सांगतले की, ''आमच्या वडिलांपासून आम्ही राजर्षी शाहू महाराजाचे विचार मानणारे आहोत. त्यामुळ आम्ही मानवता हाच खरा धर्म असल्याचं मानतो. '' तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत