शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

​Interesting : ‘या’ प्रकारच्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात महिला !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 8:14 AM

विशेषत: असे पुरुष महिलांना जास्त आकर्षित वाटतात जे घरकामात पत्नीला मदत करतात. जाणून घेऊया अजून कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.

घरात पती आणि पत्नी दोघांची जबाबदारी वेगवेगळी असते. पतीवर आर्थिक जबाबदारी असते तर पत्नीवर घराच्या सर्व कामकाजाची आणि परिवारातील सर्व सदस्यांच्या देखरेखीची जबाबदारी असते. मात्र सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार पत्नीदेखील आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी स्वत:ला सक्षम समजते आणि त्यादृष्टिने तिचे प्रयत्नही सुरु आहेत. यावरूनच पत्नीचीही अपेक्षा असते की, आपल्या पतीनेही घरकामात मदत करावी. विशेषत: असे पुरुष महिलांना जास्त आकर्षित वाटतात जे घरकामात पत्नीला मदत करतात. जाणून घेऊया अजून कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.* एकमेकांच्या जबाबदारीची जाणिव  जेव्हा पतीदेखील पत्नीच्या कामात मदत करतो, तेव्हा दोघांना एकमेकांच्या जबाबदारीची जाणिव होत असते. अशावेळी दोघांना एकमेकांच्या जवळ येण्याची संधीही मिळते. यामुळे जबाबदारीचे ओझेदेखील कमी होते.  * बरोबरीची जाणिव  पत्नी नोकरीवरून परत आल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी निभविते मात्र हीच गोष्ट पतीदेखील समजत असेल तर दोघांचे नाते अजून घट्ट होते. पतीने सर्वच कामे करावीत असे मुळीच नाही मात्र लहान-लहान कामात पत्नीला मदत करु शकतो.   * सोबत वेळ घालविणे  जेव्हा घराच्या कामात दोघे एकत्र सोबत असतात, तेव्हा त्याचा एक फायदा हा देखील होतो की, दोघेही एकमेकांसोबत काही वेळ व्यतित करु शकतात. यामुळे दोघेजण एकमेकांना चांगले समजू लागतात.  *  एकमेकांना समजण्याची संधी लग्नानंतर दोघांना आयुष्यभर सोबत राहायचे असते. यासाठी दोघांना एकमेकांच्या सवयी, आवड-निवड यांची माहिती असावी. घरकाम सोबत केल्यास या गोष्टींबाबत माहिती तर मिळते शिवाय नात्यात सुधारणा होऊन नवेपण येते.   * प्रेम बहरणेबऱ्याचदा नोकरीनिमित्त दोघेही दिवसभर बाहेर असतात. संध्याकाळी आल्यानंतर दोघांनीही घरकामात सोबत वेळ व्यतित केला तर एकमेकांमध्ये प्रेम टिकून राहते आणि दिवसेंदिवस ते बहरत असते. यामुळे प्रेमाचा ओलावा दोघांच्या आयुष्यात कायम टिकून राहतो. नात्यात कधी कटूता येत नाही. थोडे वाद झालेच तर घरकामाच्या वेळी ते मिटून जातात आणि पुन्हा तेच प्रेम फुलू लागते. Also Read : ​Interesting : ...म्हणून अशा महिलांकडे आकर्षित होतात पुरुष !                    : Relation : मुली मैत्री करण्यापासून पडताय लांब, या पद्धतीने करा इंप्रेस !