तुमच्या रिलेशनशिपमध्ये सतत वाद होत असतील तर याचं कारण तुमचा मोबाईलही असू शकतो. ऐकून धक्का बसला का? हो...तुमचा मोबाईल तुमच्या रिलेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या पार्टनरला तुम्ही किती अॅट्रॅक्टिव्ह वाटता? हेही तुमच्या मोबाईलवरच अवलंबून असते.
तुम्ही कदाचित विचारात पडला असाल की, तुमचं रिलेशन आणि मोबाईलचा नक्की संबंध काय? तर एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, तुमच्या पार्टनरला इंम्प्रेस करण्यासाठी तुमचा मोबाईल फार महत्त्वाची भूमिका बजावतो. जितका महाग मोबाईल तितकी तुमची आर्थिक बाजू प्रबळ असे लोकांना वाटते.
Decluttr ही जुन्या टेक्निकल गोष्टी विकणारी कंपनी आहे. या कंपनीने जवळपास 1500 पेक्षा जास्त सिंगल लोकांवर संशोधन केले आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या रिलेशनशिपबाबत आणि आवडत्या मोबाईलबाबत प्रश्न विचारण्यात आले.
संशोधनातून असे सिद्ध झाले की, 70 टक्के सिंगल लोकांना अन्ड्रॉइड यूजर्सपेक्षा आयफोन यूजर्सना डेट करण्याची इच्छा आहे. याव्यतिरिक्त संशोधनात सहभागी असलेले 5 पैकी 2 लोकांचे म्हणणे आहे की, पार्टनरवर पहिलं इम्प्रेशन हे मोबाईलचं पडतं.
संशोधनातून हे देखील सिद्ध झालं आहे की, जवळपास 65 टक्के आयफोन यूजर्स अॅन्ड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या लोकांसोबतच रिलेशनमध्ये राहण्यासाठी कम्फर्टेबल असतात. तसेच 45 टक्के आयफोन यूजर्स असेही आहेत जे आयफोन यूजर्ससोबत रिलेशनमध्ये राहण्यासाठी उत्सुक नाहीत.
संशोधनात सांगण्यात आल्यानुसार, केवळ 53 टक्के अन्ड्रॉइड यूजर्स आयफोन यूजर्ससोबत डेटवर जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर डेटवर गेल्यानंतर आयफोन यूजर्सच्या मनाविरूद्ध झालं की, डेट मध्येच सोडून ते निघून जातात. तसेच जास्तीत जास्त आयफोन यूजर्स त्यांच्या पार्टनर सोबत ब्रेकअपही करतात.