आलिशान हॉटेलसारखे कारागृह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 3:03 PM
एक असे कारागृह आहे ज्याची तुलना केवळ एखाद्या पंचतारांकित हॉटेलशी केली जाऊ शकते.
तुमचा विश्वास बसणार नाही, पण, युरोपातील आॅस्ट्रिया देशात एक असे कारागृह आहे ज्याची तुलना केवळ एखाद्या पंचतारांकित हॉटेलशी केली जाऊ शकते. तशाच सुविधा इथे ठेवल्या गेलेल्या कैद्यांना मिळतात. ‘जस्टिस सेंटर लियोबेन’ नावाचं हे कारागृह गेल्या 11 वर्षांपासून इथे दिल्या जाणाºया सोयींसाठी प्रसिद्ध आहे. हे कारागृह आॅस्ट्रियातील लियोबेन शहरात आहे. हे शहर पहाडी शहर असून त्याचे सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालते. जोसेफ होहेंसिन्न नावाच्या एका सुप्रसिद्ध आॅस्ट्रियन वास्तुविशारदाने या कारागृहाची निर्मिती केली आहे.या कारागृहात 200 पेक्षा जास्त कैद्यांच्या राहाण्याची सोय केली जाऊ शकते. इतकंच काय तर या कारागृहात अत्याधुनिक जिम, स्पा आणि अनेक प्रकारची खेळ खेळण्याची व्यवस्थाही केली गेली आहे. एकाच वेळेस एका ठिकाणी 13 कैद्यांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाते.">http://