(Image Credit : www.loveaholics.com)
वेगवेगळ्या रिसर्चमधून आणि अनेकांच्या निरीक्षणातून हे स्पष्ट झालं आहे की, केवळ मुलंच नाही तर मुलीही फ्लर्टिंग करतात. हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. पण महत्त्वाची बाब ही आहे की, फ्लर्ट करताना तुम्हाला तुमच्या सीमा माहीत असायला हव्यात. फ्लर्ट करणं ही एक कला आहे. कारण फ्लर्ट करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला न दुखवता त्यांच्या जीवनात तुमच्या पद्धतीने जागा निर्माण करत असता. त्यामुळे चला जाणून घेऊ फ्लर्ट करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
फ्लर्ट का करतात लोक?
(Image Credit : www.youtube.com)
काही लोकांसाठी फ्लर्ट टाइमपास करण्याची पद्धत असते आणि ते ही गोष्ट फार एन्जॉय करतात. तर काही लोक फ्लर्ट करून समोरच्या व्यक्तीला परखण्याचा प्रयत्न करतात. ते हे तपासून बघत असतात की, भविष्यात त्या व्यक्तीसोबत खास नातं तयार होऊ शकतं किंवा नाही.
वाईट नाही फ्लर्ट करणं
(Image Credit : www.lovepanky.com)
फ्लर्ट एकप्रकारची गंमत असते. पण या गंमतीतूनच तुम्ही दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणून घेऊ शकता आणि तुमच्या मनातील गोष्टी अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता. तसेच स्थिती बिघडू नये आणि नातं सामान्य रहावं म्हणून हा मार्ग अवलंबतात. मात्र, असं काही करत असताना तुमच्या बोलण्यात कटूता येईल असं काही वापरू नका.
एकटक बघू नका, नोटीस करा
(Image Credit : guff.com)
प्रत्येकासोबत फ्लर्ट करणं टाळलं पाहिजे. कारण याने तुमची चांगली इमेज डागाळण्याची शक्यता असते. जर तुम्ही कुणाला पसंत करत असाल आणि त्या व्यक्तीसोबत नात्याबाबत भविष्यातील काही शक्यतांचा शोध घेत असाल तर तुम्ही फ्लर्टचा आधार घेऊ शकता. पण हे करत असताना समोरच्या व्यक्तीला अपमानित वाटेल किंवा मन दुखावलं जाईल असं काहीही करू नका. कोणत्याही व्यक्तीसोबत फ्लर्ट करताना त्या व्यक्तीकडे एकटक बघू नका. त्यांच्या वागण्या-बोलण्याला नोटीस करा आणि जाणून घ्या की, तुमचं काही होण्याची शक्यता आहे की नाही.
हा सर्वात महत्त्वाचा नियम
(Image Credit : www1.cbn.com)
फ्लर्ट मुलीने करो अथवा मुलाने. याचा पहिला नियम असतो की, तुमच्या चेहऱ्यावर एक आकर्षक स्माईल असावी. या स्माईलमुळे तुमचा लूक चांगला होतो आणि सोबतच तुमच्यात आत्मविश्वासही वाढतो. हसरा चेहरा हा समोर असलेल्या व्यक्तीला एक पॉझिटिव्ह स्पेस देतो.
जास्तीत जास्त जाणून घ्या
(Image Credit : theanatomyoflove.com)
फ्लर्टिंग करताना तुमचा उद्देश समोरच्या व्यक्तीबाबत जास्तीत जास्त जाणून घेणे हा असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या दुनियेत हरवून जाऊ नये किंवा केवळ तुमच्याच गोष्टींची टेप परत परत वाजवू नये. समोरच्या व्यक्तीलाही बोलण्याची संधी देऊ नये. त्यांचं बोलणंही निट ऐका आणि त्यातून त्यांचा दृष्टीकोन जाणून घ्या.
स्पर्श करा अथवा नका करू
(Image Credit : www.mantelligence.com)
फ्लर्ट करताना तुम्ही मुलीला स्पर्श करणे चुकीचं नाही. पण असं केवळ तुम्ही एका कम्फर्ट लेव्हलला आल्यावरच करू शकता. तसेच त्या मुलीची काही हरकत नसेल तरच करू शकता. मुलींना वाईट आणि चांगल्या स्पर्शाची चांगलीच ओळख असते. तसेच स्पर्श करणे म्हणजे लिमिट क्रॉस करणे असं अजिबात नाही. असं जर झालं तर तुम्ही तुमची फ्लर्ट करण्याची संधीही गमावता आणि तुमची इमेजही बिघडवून घेता.