Kiss Day: आज व्हॅलेंटाईन वीकमधील Kiss Day आहे. लोक किसच्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांवर आपलं प्रेम व्यक्त करतील. आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम व्यक्त करण्याची ही सगळ्यात चांगली पद्धत मानली जाते. एक्सपर्ट असंही सांगतात की, किसमुळे जोडीदारांमधील अंतरही कमी होतं. जगभरात किसचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे किस करताना डोळे बंद होतात. पण अनेकांना याचं कारण माहीत नसतं. आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.
तुम्हालाही अनेकदा या गोष्टीचा अनुभव आला असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? यामागचं कारण काय असतं? आज आम्ही यामागचं वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.
किस करताना डोळे का बंद होतात?
किस करताना डोळे बंद होण्याचं कारण जाणून घेण्यासाठी लंडन यूनिव्हर्सिटी (University of London) च्या रॉयल होलोवे (Royal Holloway) ने एक स्टडी केला होता. ज्यात असा खुलासा करण्यात आला आहे की, याचं कारण 'सेंस ऑफ टच' असं आहे.
सायकॉलॉजीस्ट सॅंड्रा मर्फी आणि पोली डाल्टन यांनी 'सेंस ऑफ टच' बाबत सांगितलं की, किस करताना पार्टनर्समध्ये एकमेकांच्या फार जवळ आल्यावर फिलिंग जागृत होते.
डोळे उघडे असले तर...?
रिसर्चनुसार, किस करताना डोळे बंद होण्याचा अर्थ असा आहे की, पार्टनर्स एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले आहेत आणि त्यामुळेच डोळे बंद होतात. तेच जर डोळे उघडे असेल तर बाहेरच्या गोष्टींवर लक्ष जातं. त्यामुळे ते एकमेकांमध्ये हरवू शकत नाहीत.
रिसर्चमधून खुलासा झाला की, डोळे उघडे असल्याने लोक 'सेंस ऑफ टच' प्रति कमी सेन्सिटिव्ह होते. कारण त्यांचा मेंदू एकावेळी दोन गोष्टींवर फोकस करू शकत नव्हता.