रिलेशनशीपमध्ये असताना अनेकदा पार्टनरला आपण कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणायला आपण चाचपडत असतो. अनेकदा कपल्सना सल्ला दिला जातो की प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर हो म्हणायची सवय लावा. नात्यांमध्ये जर वाद टाळायचे असतील तर पार्टनरच्या किंवा त्यांच्या घरच्यांच्या गोष्टींना हो म्हणायला शिका. पण तुम्हाला माहित आहे का नात्यांमध्ये जितकं महत्व हो म्हणण्याला असंत तितकचं ते नाही म्हणण्याला सुद्धा असतं.
प्रत्येक गोष्टीमध्ये हो म्हटल्यास एकमेकांच्या आवडी निवडी समजण्यास अडचण येते. एका ठराविक वेळेपर्यंत नातं व्यवस्थित चालतं. त्यानंतर आवडी निवडींवरून खटके उडायला सुरूवात होते. यापेक्षा जर तुम्ही नाही म्हणालात तर पार्टनरची आवड निवड समजण्यास मदत होईल.
दुखावले जाण्याची शक्यता कमी असते
जर तुम्हाला काही गोष्टींबाबत मस्करी केलेली आवडत नसेल आणि तुमच्या पार्टनरला त्याच गोष्टींची मस्करी करायला आवडत असेल तर तुम्ही कितीही नाराज असाल तरी तुम्ही तुमच्या पार्टनरला मस्करी करण्यापासून नाही थांबवू शकतं. हीच गोष्ट बोलण्याच्या बाबतीत सुद्धा लागू होते. ( हे पण वाचा-Flirting च्या 'या' १० गोष्टी वाचून Flirt करणारे अन् न करणारे देखील होतील अवाक्!)
ताण-तणाव वाढत नाही
(image credit- ohsinsinder.com)
ज्या गोष्टी तुम्हाला रोजचं जीवन जगत असताना आवडत नाहीत. त्याच जर तुम्हाला वारंवार कराव्या लागत असतील तर तुम्हाला मानसीक किंवा शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला घरातील एखाद्या व्यक्तीचं वागणं किंवा बोलणं तसंच पार्नटरच्या काही गोष्टी खटकत असतील तर बोलून आपलं मत मांडा. कारण जर तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत असाल तर त्यामुळे तुमची मानसीक स्थिती बिघडून सतत ताण येण्याचा धोका असतो. ( हे पण वाचा-बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात! )
बॉडिंग चांगलं होईल
पार्टनरला नाही म्हटल्यामुळे तुम्हाला एकमेकांच्या पसंतीचा आदर करता येईल. एकमेकांच्या आवडी निवडी माहीत असतील तर वाद होण्याची स्थिती टाळता येऊ शकते. पण यासाठी कधी हो म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण नेहमी नाही म्हणण्यामुळे सुद्धा या गोष्टीचा नकारात्मक परीणाम होऊ शकतो.