(image credit- arabia weddings)
आज सगळ्याच्याच आवडीचा असलेला चॉकलेट डे आहे. आज व्हॅलेनटाईन वीकचा तिसरा दिवस आहे. तुम्हाला हे माहित असेल की आनंदात असताना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोक एकमेकांना चॉकलेट्स देतात. आज अनेक कपल्स एकमेकांना चॉकलेट देऊन आनंद साजरा करतात. पण पार्टनर तुमच्यावर रागावला असले तर राग घालवण्यासाठी चॉकलेट हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी त्यांच्या आवडत्या चॉकलेटचं मोठं सेलिब्रेशन पॅक देऊन तुम्ही त्यांना खुश करु शकता.
पार्टनरलाच नाही तर तुम्ही आपल्या घरातील लहानमुलांना चॉकलेट देऊन सुद्धा चॉकलेट डे साजरा करू शकता. पण त्यासाठी कोणतं चॉकलेट द्यायला हवं हे माहित असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्य़ा व्यक्तीला कोणतं चॉकलेट द्यायला हवं.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट्स आपण आपल्या जोडीदाराला सुरक्षित ठेवू, त्याची किंवा तिची काळजी घेऊ असा संदेश जोडीदारापर्यंत पोहचवते. डार्क चॉकलेटची चव कडवट असली तरी डार्क चॉकलेटचे अनेक फायदे ही आहेत.
व्हाईट चॅाकलेट
व्हाईट चॉकलेट्सची एक वेगळीच टेस्ट असते. व्हाईट चॉकलेटची चव सौम्य आहे, जर तुमची जोडीदाराचा स्वभाव तसा असेल व्हाईट चॉकलेट भेट द्यायला काहीच हरकत नाही.
मिल्क चॅाकलेट
मिल्क चॅाकलेट म्हणजे व्हाईट चॉकलेट नाही. मिल्कीबारच्या लोकप्रियतमुळे आणि एका विशिष्ट पध्दतीने झालेल्या त्याच्या मार्केटिंगमुळे भारतात हा मोठा गैरसमज आहे. भारतात मिल्क चॉकलेटला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. रोमँटिक भावनांशी मिल्क चॉकलेटला जोडलं जातं. ( हे पण वाचा-Chocolate day ; नात्यात गोडवा आणणाऱ्या चॉकलेटचे हृदयाला होणारे फायदे नक्की वाचा!)