रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोन यांनी ६ वर्ष डेटिंग केल्यानंतर एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लग्न बंधनात अडकण्याच्या विचार केला. या कपल्सच्या लग्नाने त्यांची कुटुंबच नाही तर दोन्ही स्टार्सचे फॅन्स सुद्धा खूश आहेत. करिअर आणि स्वतःच्या नात्यातील अनेक गोष्टी सांभाळून त्यांनी आपल्या नात्यातील प्रेम आत्तापर्यंत टिकवून ठेवले आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या नात्यातील सुंदर प्रवासाबदद्ल आणि त्यांचे प्रेम टिकून राहण्यामागे नेमके काय कारण आहे हे सुद्धा सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे यांच्या प्रेमाचं गुपीत.
एकमेकांना आयुष्यात प्रायोरिटी
रणवीर आणि दीपिका हे दोन्ही एकमेकांंना प्रायोरिटी लिस्टमध्ये टॉपला ठेवत असतात. जरी दोघंही शुटींगमध्ये व्यस्त असले तरी किंवा कोणत्याही इवेंन्टमध्ये एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली की क्वालिटी टाईम स्पेड करतात. दीपिकाने एका मुलाखतीमध्ये स्वतः सांगितले होते. की ती आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये रणवीरला टॉपला ठेवते. रणवीरला खूप स्पेशल ट्रिट करते.
नेहमी साथ देणे
एनिव्हरसरी असो किंवा कोणताही फेस्टिवल असो नेहमी दोघं एकमेकांच्या सोबत असतात. एकमेकांच्या प्रोजेक्टसना घेऊन हे दोघं ही आयुष्यात खूपच व्यस्त असतात. सोशल मिडियावरचे अनेक फोटो पाहून आपल्याला दिसून येतं की एकमेकांसोबत आनंदाचा वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ( हे पण वाचा-पार्टनरकडून गरजा पूर्ण होत नसतील तर काय कराल?)
एकमेकांच्या आवडीनिवडींचा सन्मान
दीपीकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की ते आपल्या पार्टनरच्या आवडी निवडींचा आदर करते.तसंच स्वतःच्या इच्छा अपेक्षा एकमेकांवर लादत नाहीत. रणवीरच्या चॉईसवरून अनेकदा विनोद केले जातात. पण दीपिका रणवीरला कोणत्याही बाबतीत रोखत नाही.
एकमेकांचा आदर
रणवीर आणि दीपीका एकमेकांवर फक्त प्रेमच करत नाहीत तर एकमेकांचा आदर सुद्धा करतात. ही गोष्ट त्यांच्या करीअर आणि पर्सनल लाईफमध्ये दिसून येते. दोघंही एकमेकांना इगो कधीही दाखवत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे प्रसंग येत असतात. तसंच दीपिकाच्याही आयुष्यात मधल्या काही काळात असे प्रसंग आले होते. पण त्या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. यांच्या प्रेमाची सुरूवात झाली तेव्हा दीपिका स्टार होती आणि रणवीर आपल्या करीअरची सुरूवात करत होता. अनेक उतार चढाव येऊन सुद्धा या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यामुळेच त्याच्या नात्यातील गोडवा टिकून आहे.