कोणतीही मुलगा किंवा मुलगी रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर एकमेकांना पूर्णपणे ओळखू लागतात. पण जेव्हा दोघांपैकी एकाला जरी राग आला तर एकमेकांवर संशय घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच खोटं बोलण्याची सवय वाढू लागते. अर्थात प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. पण राग व्यक्त करत असताना एकमेकांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. असा प्रकार जर रिलेशनशीपमध्ये वारंवार घडत राहीला तर ब्रेकअप होतं.
जेव्हा कोणत्याही रिलेशनशीपमध्ये दोन व्यक्ती एकमेकांपासून दूर जात असतात. तेव्हा दोघांनाही हर्ट होऊन भावना दुखावलेल्या असतात. पण आपल्याला उगाच असं वाटत असतं की आपल्या पार्टनरला या गोष्टींचं काहीच वाटत नाहीये. मग वॉट्सएपचे स्टेटस चेक करायला सुरूवात होते.जेव्हा ब्रेकअप होतं तेव्हा दोघांनाही मानसीक ताण येत असतो. अर्थाच आपल्या पार्टनरला आपण लांब गेल्यामुळे काय फरक पडतो. किंवा त्याची मनस्थिती कशी आहे. तो किंवा ती आपल्याशी परत बोलायला येईल की नाही. किंवा never give up असं रिएक्ट करेल का? असं आपल्याला पार्टनरपासून लांब गेल्यानंतर वाटत असतं. आज आम्ही तुम्हाला पार्टनर तुमच्यापासून दुरावसल्यास त्यांना काय वाटतं हे कसं जाणून घ्यायचं हे सांगणार आहोत. ( हे पण वाचा-एखाद्या मुलीला तुमच्यात इन्टरेस्ट आहे की नाही कसं ओळखाल? असे आहेत संकेत)
बोलण्यावरून ओळखा
(image credit-relationship.femalefirt.uk)
जर ब्रेकअपनंतर तुम्हाला तुमच्या एक्स पार्टनरशी बोलायचं असेल आणि तुम्ही बोलत असताना तुमचा एक्स पार्टनर तुम्हाला शांत राहायला सांगून तुमच्यावर रागवत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला असलेला राग समजावून घेऊन त्यांचाशी बोलणं टाळा. कारण रागात असतान बोलाल तर अधिक भांडण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जास्त फोर्स न करता बोलणं थांबवा.
तुम्ही दिलेल्या वस्तू परत देणे
अनेक कपल्स नातं संपल्यानंतर आपल्या पार्टनरने दिलेल्या वस्तू परत करत असतात. किंवा फेकून देतात. कारण काहीजणांना पार्टनर सोबतच पार्टनरने दिलेल्या वस्तुंचा सुद्धा राग येतो. त्यांना तुमच्या कोणत्याच आठवणी ठेवायच्या नसतात. जर तुमचा पार्टनर तुमचा पार्टनर तुम्ही दिलेल्या वस्तु फेकून देत असेल तर पार्टनरला तुमच्यासोबत राहण्यात काही इन्टरेस्ट नाही हे लक्षात घ्या.
सोशल मिडियावर राग काढणे
जर तुमचा एक्स पार्टनर सोशल मिडियावर नकारात्मक पोस्ट लिहित असेल तर त्याचा अर्थ असा की तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज आहे. तुम्ही जास्तवेळ आपल्या एक्स पार्टनरसोबत राहून वेळ घालवू नका. ( हे पण वाचा-मुलींना बोरींग नाही तर असं वागणारी मुलं आवडतात, तुम्ही कसे आहात? )
तुमच्या मित्र- मैत्रिणींशी बोलणे
तुमच्या मित्र- मैत्रिणींशी बोलून जर तुमचा पार्टनर तुमची विचारपूस करत असेल तुमच्या दूर जाण्याने पार्टनरला दुख झाले आहे. हे समजून घेऊन मग पार्टनरशी वागा. यातून असं दिसून येतं तुमच्या एक्स पार्टनरला तुमच्याबद्दल अजुनही काळजी वाटते.