(Image Credit : Inc.com)
अनेकजण रिलेशनशिपमध्ये फार कन्फ्यूज असतात. कारण हे लोक प्रेमात इतके हरवलेले असतात की, रिलेशनचं महत्व विसरून जातात. मुळात कोणत्याही नात्यात हे माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय आणि किती डिजर्व्ह करता? नात्यांचं महत्व निर्माण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले गेले पाहिजे. मात्र, या प्रयत्नांमध्ये तुम्हाला नेमकं काय हवंय हे माहीत असलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही एक चांगलं नातं निर्माण करू शकता. प्रत्येक नात्यात काहीना काही अपेक्षा असतात, चला जाणून घेऊन काय असतात त्या अपेक्षा.
(Image Credit : Victoria Buzz)
काही महिला रिलेशनशिपबाबत स्पष्ट नसतात. त्यांना हेच माहीत नसतं की, त्यांना रिलेशनशिपमधून काय हवंय? पार्टनरचं प्रेम, सपोर्ट करणं, घरातील कामात मदत करणं, रोमान्स किंवा काळजी करणं. या सगळ्या गोष्टींमुळे महिला इम्प्रेस होतात आणि यालाच प्रेम समजून बसतात. पण वास्तविकता ही नसते. प्रेमात प्रत्येकाच्या अपेक्षा-गरजा वेगवेगळ्या असतात.
(Image Credit : Freepik)
जर तुम्ही ऑनलाइन डेटींगच्या माध्यमातून प्रेम शोधत असाल तर हे ठरवणं गरजेचं आहे की, तुम्हाला पार्टनरकडून काय हवंय आणि प्रेमाकडे कशाप्रकारे बघायला तुम्हाला आवडतं. सर्वातआधी तुमच्या गरजा, अपेक्षा ओळखा आणि पार्टनरसोबत याबाबत बोला.हे गरजेचं नाही की, तुमच्या सर्वच गरजा पार्टनरला समजतील. त्यामुळे पार्टनरसोबत याबाबत प्रेमाने आणि शांतपणे बोला. रागाने किंवा जबरदस्तीने तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. रिलेशनशिपमध्ये एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. तेव्हाच तुम्हाला हे कळू शकतं की, तुम्ही या रिलेशनशिपमध्ये कुठे आहात आणि तुम्ही काय डिजर्व्ह करता.
(Image Credit : A Conscious Rethink)
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये गरजेचं नाही की, तुम्ही जसा विचार करता किंवा डिजर्व्ह करता तसंच होईल. कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वाईटही वाटू शकतं. पार्टनरच्या वागण्यावरून तुम्ही निराश होऊ शकता. प्रत्येकाचं वागणं, स्वभाव वेगवेगळे असतात आणि ते बदलणं कठीण असतं. जर तुमच्यात काही कारणाने वाद झाला असेल तर तुमच्या सहनशक्तीतील काही मिनिटे वेळ काढा आणि पार्टनरसोबत नेमकी समस्या काय आहे यावर मोकळेपणाने बोला.
(Image Credit : Reader's Digest)
प्रेमात काही स्पेशल केल्यावर पार्टनरला सकारात्मक रिस्पॉन्स द्या आणि आपल्या फीलिंग व्यक्त करा. पार्टनरचे काही चांगलं काम केलं असेल तर त्यांचं कौतुक करा. प्रेम मजबूत करण्यासाठी एकमेकांचं कौतुक करणं फार मोठी गोष्ट नाही. यावरून हे दिसतं की, तुम्ही तुमच्या पार्टनरच्या प्रयत्नांना नोटीस करता आणि सन्मानही करता.
(Image Credit : LoveBondings)
ज्याप्रमाणे तुम्हाला रिलेशनशिपमधून काही अपेक्षा आहे आणि गरजा आहे, त्याचप्रमाणे तुमच्या पार्टनरच्याही काही तुमच्याकडून काही अपेक्षा असतील. त्यामुळे दोघांनीही काही गोष्टींची लिमिट ठरवा. जशी तुम्हाला पार्टनरची एखादी गोष्ट पसंत नसेल तशीच त्यांनाही तुमच्यातील एखादी गोष्ट पसंत नसेल. त्यामुळे केवळ पार्टनरच्याच व्यवहाराला न बघता स्वत:कडेही बघा.