शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राशींवरून उलगडणार कोडं... रिलेशनशिपमध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व देतात मुली? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:18 AM

आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि आवड-नाआवड वेगवेगळी असते. त्याचप्रकारे रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. जिथे काही मुली आपल्या पार्टनरसोबत शांततेत वेळा घालवणं पसंत करतात.  तर काही मुलींना अ‍ॅडव्हेंचर्स गोष्टी करायला आवडतात.

(Image Credit : scribol.com)

आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि आवड-नाआवड वेगवेगळी असते. त्याचप्रकारे रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. जिथे काही मुली आपल्या पार्टनरसोबत शांततेत वेळा घालवणं पसंत करतात.  तर काही मुलींना अ‍ॅडव्हेंचर्स गोष्टी कराया आवडतात. आज आम्ही राशींनुसार, जाणून घेऊया तुमची पार्टनर रिलेशनशिपमध्ये कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात त्याबाबत... 

मेष राशी

मेष राशीच्या मुलींचा स्वभाव फार रोमॅन्टिक असतो. तसेच आपल्या पार्टनरसोबतचा प्रत्येक क्षण त्यांना सुंदर करायचा असतो. असं सांगितलं जातं की, या मुली आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी फार प्रयत्नशील असतात. कारण यांच्यासाठी आपल्या पार्टनरचा आनंद जास्त महत्त्वाचा असतो. 

वृषभ राशी

असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुली रिलेशनशिपमध्ये एकनिष्ठतेला सर्वात जास्त महत्त्व देतात. या आपल्या पार्टनरसोबत एकनिष्ठ असतातच पण यांनाही आपल्या पार्टनरकडून तिच अपेक्षा असते. या राशींच्या मुलींसाठी नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास असणं महत्त्वाचं असतं. 

मिथुन राशी

या राशींच्या मुलींची क्रिएटिव्हिटी आपल्या नात्याला आणखी इंटरेस्टिंग बनवते. असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुली आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर उपाय आपल्या हटके आणि क्रिएटिव्ह अंदाजात शोधून काढतात. याच कारणामुळे त्यांचं नातं आणखी खुलण्यास मदत होते. तसेच त्यांना आपल्या पार्टनरनेही असचं आपलं नातं जपावं अशी अपेक्षा असते. 

कर्क राशी

कर्क राशीच्या मुली रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त महत्त्व प्रेमाला देतात. असं सांगितलं जातं की, या मुली आपलं नातं मनापासून जपतात. तसेच आपल्या पार्टनरनेही असंच करावी अशी त्यांची अपेक्षा असते. या मुलींना पार्टनरच्या आयुष्यात अशी जागा तयार करायची असते. जी कधीच कोणी घेऊ शकणार नाही. 

सिंह राशी 

असं सांगितलं जातं की, सिंह राशीच्या मुलींसाठी कोणत्याही गोष्टीमध्ये मिळवलेलं यश हे फार महत्त्वाचं असतं. गोष्ट जेव्हा रिलेशनशिपची असते, तेव्हा या मुलींना पार्टनरनेही आपली साथ द्यावी असं वाटत असतं. 

कन्या राशी

कन्या राशीच्या मुलीं आपल्या पार्टनरच्या विचारांना फार महत्त्व देतात. त्यानंतर जग त्यांच्याबाबत काय विचार करतं यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. असं सांगितलं जातं की, जोपर्यंत त्यांच्या पार्टनरला त्यांचं वागणं आणि बोलणं चांगलं वाटतं तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात सगळं काही ठिक असतं. 

तुळ राशी 

असं सांगितलं जातं की, पर्सनल असो किंवा प्रोफेशनल लाइफ, तुळ राशीच्या मुलींना नेहमी आपलं बेस्ट द्यायला आवडतं. यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट बॅलेन्स असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यांना आपल्या नात्यामध्ये शांती हवी असते. 

वृश्चिक राशी

पार्टनरसोबतचा प्रत्येक क्षण यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. असं सांगितलं जातं की, आपल्या आयुष्यातील कोणताही क्षण त्यांना दुःखी होऊन व्यतित करायचा नसतो. तसेच या राशीच्या मुली आपल्यातील पॅशनला फार व्हॅल्यू देतात. 

धनू राशी

असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुलींसाठी आयुष्यामध्ये नवनवीन गोष्ट घडणं महत्त्वाचं असतं. जेव्हा गोष्ट यांच्या रिलेशनची असते, त्यावेळी या मुली त्यामध्येही वरायटी शोधतात. यांना यांच्याप्रमाणेच विचार असणारा पार्टनर असावा असं वाटतं. तसेच या मुलींना पार्टनरसोबत अॅडव्हेंचर्स ट्रिपसाठी जायला फार आवडतं. 

मकर राशी

अत्यंत मेहनती, मोकळ्या विचारांच्या असतात या मुली. असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुली फार महत्त्वकांशी असतात. आपल्या पार्टनरबाबत या राशीच्या मुली फार स्वप्न पाहतात. 

कुंभ राशी

असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुली अत्यंत दयाळू आणि निर्मळ मनाच्या असतात. तसेच आपला पार्टनरही असाच असावा अशी यांची इच्छा असते. या राशीच्या मुली सामाजिकरित्या फार सक्रिय असतात आणि आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि शांती राखण्याचा प्रयत्न करतात. 

मीन राशी

मीन राशीच्या मुली आपल्या पार्टनरकडून स्वातंत्र्याची आशा ठेवतात. नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध त्यांना आवडत नाहीत. असं सांगितलं जातं की, या राशीच्या मुलींना आपल्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध आवडत नाहीत. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यPersonalityव्यक्तिमत्वRelationship Tipsरिलेशनशिप