प्रेमाचं नातं सुरुवातीला फारच चांगलं वाटत असतं. काही महिने एकमेकांना समजून घेण्यात जातो. पण कधी कधी पार्टनरला समजून घेण्यात आयुष्य कमी पडतं. पण रिलेशनशिपच्या एका वर्षात दोघांचं प्रेम कोणत्या स्टेजवर येतं हे आपण जाणून घेणार आहोत. एका वर्षाच असे कोणते बदल दोघांमध्ये होतात हे जाणून घेऊया.
1) आता इम्प्रेस करण्याची गरज नाही
गर्लफ्रेन्ड असो वा बॉयफ्रेन्ड रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात एकमेकांना इम्प्रेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. पण एक वर्षांनंतर दिखाव्यापेक्षा जास्त साथ जास्त महत्वाची वाटते. तेव्हा इम्प्रेस करण्याची गरज पडत नाही.
2) वाईट सवयी
काही खाताना किंवा जेवण करताना आवाज करणे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, रात्री न सांगता झोपणे या वाईट सवयी सुरुवातीला क्यूट वाटतात. पण एका वर्षाने या सवयी त्रासदायक वाटायला लागतात.
3) केवळ प्रेम नाहीये
एका वर्षानंतर तुम्ही एकमेकांच्या मित्रासारखे वागता. तुमचं नातं आता केवळ प्रेमापुरतं राहिलेलं नसतं. कोण कोणत्या गोष्टीवर कसं रिअॅक्ट करणार, कोण कधी रागावणार हे तुम्हाला माहीत असतं.
4) बोलण्याची पद्धत
सुरुवातीला प्रत्येक गोष्ट बोलण्याआधी तुम्ही विचार करत होतात. एखाद्या गोष्टींचं वाईट वाटू नये याचा विचार करत होतात. पण आता या गोष्टींचा फरक कमी पडतो. कारण वेळेनुसार पसंत, मूड या अंदाज लावला जातो.
5) सवयींची सवय
एकमेकांसमोर ढेकर देणे, मॅनर्सचा विचार न करता जेवण करणे आणि अधिक कम्फर्टेबल झाल्यावर कपल्स कोणतीही गोष्ट करण्यात लाजत नाहीत. सुरुवातीला या गोष्टींची लाज वाटत असते. पण वेळेनुसार ही लाज कमी होते.