शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पार्टनरची खिल्ली उडवणे पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 12:18 PM

तुमच्या अशा काही सवयीही तुमच्या नात्यात मिठाचा खडा टाकू शकतात. चला जाणून घेऊ तुमची पार्टनरची खिल्ली उडवण्याची कोणती सवय तुम्हाला महागात पडू शकते.   

अनेकदा आपण आपल्या पार्टनरच्या काही सवयींवरुन त्यांची खिल्ली उडवण्याची संधी सोडत नाही. पण एका रिसर्चनुसार असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. तर दुसरीकडे तुमच्या अशा काही सवयीही तुमच्या नात्यात मिठाचा खडा टाकू शकतात. चला जाणून घेऊ तुमची पार्टनरची खिल्ली उडवण्याची कोणती सवय तुम्हाला महागात पडू शकते.   

दुसऱ्यांशी पर्सनल गोष्टी टाळा

आपल्या वैवाहिक जीवनातील खाजगी गोष्टी लोकांशी शेअर करु नये. कधी कधी असं होतं की, कपल्स एकमेकांच्या ज्या सवयींनी किंवा कमतरतेमुळे नाखुश असतात त्या गोष्टी ते आपल्या मित्रांसोबत शेअर करतात. तुमच्या या सवयीची माहिती जेव्हा तुमच्या पार्टनरला लागते तेव्हा तुम्हाला हे चांगलंच महागात पडू शकतं. 

प्रत्येक नात्यात हवा सन्मान

प्रेमाच्या नात्यात अनेक गोष्टी गृहीत धरण्याची चूक काही लोक करतात. काही लोक बोलताना किंवा वागताना कोणताही विचार करत नाहीत. अशावेळी तुमच्या काही बोलण्याने तुमच्या पार्टनरच्या सन्मानाला धक्का लागू शकतो. त्यामुळे आपल्या पार्टनरचा सन्मान करणे फार गरजेचे आहे. नाही तर नातं तुटू शकतं. 

बोलण्याची खिल्ली उडवणे

एकत्र राहिल्याने कपल्सना एकमेकांच्या सवयींबाबत माहिती मिळते. ज्यात एकमेकांच्या बोलण्याच्या पद्धतीचीही माहिती असते. अशावेळी काही लोक हे आपल्या पार्टनरच्या बोलण्याच्या स्टाईलचीही खिल्ली उडवतात. भलेही असे करण्यामागचा तुमचा उद्देश त्यांच्या त्या सवयीत बदल व्हावा असा असेल, पण सर्वांसमोर असे करणे तुमच्या पार्टनरला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी चारचौघात न बोलता एकट्यात समजवा. 

मोठ्या आवाजात बोलणे चुकीचे

अनेकदा काही लोकांना साधी गोष्टही ओरडून सांगण्याची सवय असते. पण या सवयीमुळ मित्रांसमोर किंवा पाहुण्यांसमोर तुम्हाला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत नेहमी नॉर्मल आवाजात बोलणं फायद्याचं होईल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट