मुंबई : तुम्हाला असं वाटतं का की जे लोक पैशांचा माज दाखवतात ते जास्त आकर्षक पार्टनर असतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर, तुम्ही चुकीचे आहात. कारण एका अभ्यासातून खुलासा झालाय की, जे लोक तरुणींसमोर पैशांचा शो-ऑफ करतात, ते आकर्षक पार्टनर नसतात.
पैसा सर्वांनाच चांगला वाटतो. पैसा असला की, लोक सर्व सोयी-सुविधा, ऐशो-आराम मिळवू शकतात. पण रिलेशनशिपबाबत असं नसतं. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळले की, जेव्हा एखादा तरुण पैशांचा रुबाब दाखवतो तेव्हा मुलींना हे संकेत मिळतात की, त्या तरुणाला तिच्याकडून लॉन्ग टर्म कमिटमेंटऐवजी शॉर्ट टर्म सेक्शुअल रिलेशनशिप हवंय.
या अभ्यासात सहभागी झालेल्या तरुणींकडून एक ऑनलाईन सर्व्हे करुन घेण्यात आला. ज्यात त्यांना डेटिंग, रिलेशनशिप आणि दुसऱ्यांबाबत आकर्षण यावर काही प्रश्न विचारण्यात आलेत. त्यानुसार त्यांनी रेटींग दिलं.
तरुणींना दोन प्रकारच्या तरुणांबाबत माहिती देण्यात आली. त्यातील एकाने नवीन गाडी खरेदी करण्यात पैसे लावले. तर दुसऱ्याने सेकंड हॅन्ड गादी खरेदी केली. दोन्ही तरुणांच्या अॅक्टिव्हिटीला रेट केल्यानंतर निकाल काढण्यात आला. यात ज्या तरुणाने महागडी गाडी खरेदी केली त्यात तरुणींनी कमी इंटरेस्ट दाखवला. कारण त्या तरुणांना लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नव्हता.
या अभ्यासाचे सह-लेखक डॅनिअल क्रुगर यांनी सांगितले की, जे लोक महागड्या वस्तू आणि इतर गोष्टींचा शो-ऑफ करतात, त्यांच्या संभोगाच्या प्रयत्नांची क्वालिटी असते आणि त्यांना शॉर्ट टर्म सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट असतो.