(Image Credit : cheatsheet.com)
पुरूष खोटं बोलण्याबाबत महिलांपेक्षा स्वत:ला दुप्पट चांगलं मानतात आणि असं करणं पुढेही सुरूच ठेवतात. असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. जर्नल पीएलओएस वनमध्ये प्रकाशित रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, खोटं बोलण्यात महारथ मिळवणारे लोक टेक्स्ट मेसेज आणि सोशल मीडियात नाही तर डोळ्यात डोळे घालून खोटं बोलतात. रिसर्चनुसार, खोटं बोलण्यात तरबेज लोक मेसेज आणि सोशल मीडियावर खोटं बोलतात.
काय सांगतो रिसर्च?
ब्रिटनच्या पोर्टसमाउथ युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि रिसर्चच्या मुख्य ब्रियाना वर्जिन म्हणाल्या की, 'आम्ही खोटं बोलण्याची खासियत आणि लिंग यांच्यातील एक महत्वपूर्ण संबंध शोधून काढलाय. पुरूष खोटं बोलण्यात स्वत:ला महिलांपेक्षा वरचढ समजता आणि त्यांना खोटं बोलणं आवडतं'.
कसा केला रिसर्च?
(Image Credit : slism.com)
या रिसर्चसाठी अभ्यासकांनी १९१ लोकांचा सर्व्हे केला. ज्यात अर्धे पुरूष तर अर्ध्या महिला होत्या. या सर्वांचं वय सरासरी ३९ वर्षे इतकं होतं. यात त्यांची खोटं बोलण्याची सवय, ते कितीवेळा खोटं बोलतात आणि कुणाशी बोलतात याची माहिती घेण्यात आली. रिसर्चनुसार, या लोकांना काही प्रश्न विचारण्यात आलेत. जसे की, दुसऱ्यांशी खोटं बोलण्यात ते पटाईत आहेत? गेल्या २४ तासात ते किती खोटं बोलले? ते कशाप्रकारचं खोटं बोलले? कुणाशी बोलले? त्यांनी डोळ्यात डोळे घालून खोटं बोलले?
खऱ्यासारखं बोलतात खोटं
(Image Credit : metro.co.uk)
ब्रियाना म्हणाल्या की, 'आम्हाला त्या लोकांवार अधिक लक्ष केंद्रीत करायचं होतं जे खोटं बोलण्यात पटाईत आहेत. यासोबतच आम्हाला हेही जाणून घ्यायचं होतं की, ते असं कसं करतात आणि कुणासोबत करतात. आमच्या असं लक्षात आलं की, हे लोक खरं वाटेल असं खोटं बोलतात. तसेच जेव्हा कुणाच्या लक्षात येतं की, ते खोटं बोलत आहेत तेव्हा ते आणखी खोटं बोलू लागतात.
महत्वाची माहिती लपवतात हे लोक
रिसर्चनुसार, जे कुणी खोटं बोलतात त्या सर्वांची खोटं बोलताना एक रणीनिती असते. ती म्हणजे हे लोक खास माहिती लपवून ठेवत होते. पण जे लोक खोटं बोलण्यात पटाईत होते ते खोटं बोलण्यासाठी एक कथा रंगवण्यात सक्षम होते. त्यामुळे त्यांचं खोटं पकडणं अवघड होतं.
खोटं आणि खरं यातील फरक कठीण
ब्रियाना म्हणाल्या की, 'चलाखीने खोटं बोलणारे लोक शब्दांचा खेळ करणं चांगलेच जाणतात. ते खऱ्याच्या अगदी जवळ असलेलं खोटं बोलतात त्यामुळे खंर आणि खोटं यातील फरक करणं कठीण जातं. तसेच ते सहजपणे गोष्टी लपवतात आणि त्यांच्या गोष्टींवर कुणाला शंकाही येत नाही'.